सारा अली खानला करिनानं असं काय विचारलं, ज्यानंतर तिला वाटली सैफची भीती

सारा अली खानला करिनानं असं काय विचारलं, ज्यानंतर तिला वाटली सैफची भीती

सारानं नुकतीच करिनाच्या ‘व्हॉट विमेन वॉन्ट’ चॅट शोमध्ये हजेरी लावाली. यावेळीच तिनं साराला असं काही विचारलं की नंतर तिला सैफची भीती वाटू लागली.

  • Share this:

मुंबई, 07 फेब्रुवारी : सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी यांची मुलगी सारा अली खान सध्या तिच्या अपकमिंग सिनेमामुळे खूप चर्चेत आहे. दरम्यान सारानं नुकतीच सैफची दुसरी पत्नी करिनाच्या ‘व्हॉट विमेन वॉन्ट’ चॅट शोमध्ये हजेरी लावाली. ज्यात करिनानं साराला तिच्या लव्ह लाइफ आणि पर्सनल लाइफबद्दल काही प्रश्न विचारले. पण यावेळीच तिनं साराला असं काही विचारलं की त्यानंतर तिला सैफची भीती वाटू लागली.

करिना कपूर खानचा रेडिओ शो व्हॉट विमेन वॉन्टच्या दुसऱ्या सीझनमध्ये सारानं नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी सारा आत्ताच्या पीढीच्या लव्ह लाइफबद्दल बोलताना दिसली. सारानं यावेळी त्याच्या वाढलेल्या वजनापासून ते तिचं बॉलिवूड पदार्पण आणि त्यानंतरचं तिचं खासगी जीवन या सर्व गोष्टींवर भाष्य केलं. दरम्यान करिनानं साराला तू कधी कोणाला नॉटी टेक्स्ट मॅसेज पाठवले आहेत का असा प्रश्न विचारला. पण हा प्रश्न विचारताना करिना पुढे म्हणाली, मला माहित नाही पण अशा करते की तुझ्या बाबांनी हे सर्व ऐकू नये. त्यावर सारा म्हणते, ‘हो’ हे ऐकल्यावर करिना सांगते, ‘मी हे सर्व घरी जाऊन त्याला सांगू शकते.’ ज्यावर सारा उत्तर देते, ‘कदाचित ते हा शो पाहतील.’ यानंतर करिना तिला सांगते, ‘ठिक आहे मी घरी जाऊन सैफला सांगेन’ यावर सारा तिला असं न करण्याचं सुचवते.

लग्नाआधी 10 वर्षं रिलेशिपमध्ये होता अंकुश चौधरी, बायको आहे प्रसिद्ध अभिनेत्री

 

View this post on Instagram

 

Happy Diwali ❤️❤️❤️

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

या शोमध्ये करिनानं साराला वन नाइट स्टॅन्डवरही प्रश्न विचारला आहे. ज्यावर सारा नाही मी असं कधीच करणार नाही असं उत्तर देते. पण हा प्रश्न विचारण्याआधी करिना थोडीशी घाबरलेली दिसते. ती म्हणते, मला माहित नाही मी हे विचारायला हवं की नको. पण ठिक आहे आपण एक मॉडर्न फॅमिली आहोत. तर तु कधी वन नाइट स्टॅन्ड केलं होतं का? सारा नाही म्हणते आणि करिना सुद्धा हे ऐकल्यावर बरं झालं ही एक चांगली गोष्ट आहे. साराच्या उत्तरानंतर करिना रिलॅक्स झालेली दिसली.

TRP मीटर :बायको' पडली 'सासूबाईं'वर भारी, पाहा तुमची मालिका कोणत्या स्थानावर

या शोमध्ये सारा तिच्या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसली. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह आजकल’ हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून 2009 मध्ये आलेल्या सैफ आणि दीपिकाच्या ‘लव्ह आजकल’चा हा पुढचा भाग आहे.

साराला उचलून घेत कार्तिक आर्यननं केला धम्माल डान्स, पाहा VIDEO

First published: February 7, 2020, 10:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading