जेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते!

जेव्हा करिना शाहिदच्या बायकोला आलिंगन देते!

एकमेकांना मिठी मारत करिनाने मीराची आवर्जून चौकशी केली. त्यामुळे ही मिठी सध्या या वर्षातली लक्षवेधी मिठी ठरलेय.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : ईशा अंबानीच्या लग्नात तमाम बाॅलिवूड स्टार्स हजर होते. तिथे अनेक जुनी दुखणी आमनेसामने आले. अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूर एका फ्लोअरवर डान्स करताना दिसले. सलमान खान आणि ऐश्वर्याही एकाच वेळी तिथे उपस्थित होते. पण अजून एक वेगळं दृश्य तिथे पाहायला मिळालं.

शाहिद कपूर आणि करिना यांचं जुनं प्रेमप्रकरण सिनेरसिक अजूनही विसरले नाहीत पण शाहिद आणि करिना मात्र ते विसरल्याचं दाखवत आहेत. ईशा अंबानीच्या लग्नाला शाहिदची पत्नी मीरा राजपूत आणि करिना कपूर यांनी  हा तिढा सोडवायचं ठरवलेलं दिसतंय.

एकमेकांना मिठी मारत करिनाने मीराची आवर्जून चौकशी केली. त्यामुळे ही मिठी सध्या या वर्षातली लक्षवेधी मिठी ठरलेय. सोशल मीडियावर याची चर्चा रंगतेय. ईशा अंबानीच्या लग्नाला करिना कपूरसोबत सैफ अली खानदेखील आला होता, तर शाहीद कपूर पत्नी मीरासोबत तिथे आला होता. यावेळी मीरा आणि करिनाचं हे आलिंगन चर्चेचा विषय ठरला.

शाहिद आणि करिना जवळजवळ तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. थोडे दिवस शाहिदचं नाव प्रियांका चोप्राबरोबर जोडलं गेलं होतं. पण बाॅलिवूडमध्ये काही दिवसांनी सगळे पुढे जातात. फ्रेंडली होतात.

काॅफी विथ करण शोच्या ग्रँड फिनालेच्या शोमध्ये करिना प्रियांका चोप्रासोबत दिसणार आहे. प्रियांका आणि करिना कपूर या एकमेकींच्या विरोधक चक्क कॉफी विथ करनच्या सहाव्या सीझनमध्ये एकत्र दिसणारेत.

लग्नानंतर प्रियांका पहिल्यांदाच मुलाखत देणार असल्याने त्यात ती आपल्या नव्या आयुष्याबद्दल सांगेल. तर करिना तैमुरच्या लोकप्रियतेबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं देईल. या दोघींनी ऐतराज या सिनेमात एकत्र काम केलं. त्यानंतर मात्र त्यांच्यात वाद झाल्याने त्यांचे संबंध ताणले गेले होते. मात्र काळाच्या ओघात हे वाद मिटले.


PHOTOS - ...म्हणून सारा अली खान अशी बुरखा घालून सिनेमा पाहायला गेली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2018 06:38 PM IST

ताज्या बातम्या