रालियाच्या नात्यात ‘ती’ची एंट्री? बहिणीच्या बेस्टफ्रेंडशी वाढतेय रणबीरची जवळीक

रालियाच्या नात्यात ‘ती’ची एंट्री? बहिणीच्या बेस्टफ्रेंडशी वाढतेय रणबीरची जवळीक

रणबीर-आलियाच्या लाइफमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 23 डिसेंबर : बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली व्यक्ती म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट. मागच्या काही दिवसांपासून हे दोघंही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र आता रणबीर-आलियाच्या लाइफमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाल्याचं बोललं जात आहे. बहीण करिना कपूरच्या एका बेस्ट फ्रेंडशी रणबीरची जवळीक वाढल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. या दोघांमधील वाढलेली मैत्री अता बी-टाउनमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

आलिया आणि रणबीर बॉलिवूडमधील कोणत्याही फंक्शनला एकत्र दिसतात. मात्र आता मागच्या काही दिवसांपासून करिना कपूरची बेस्ट फ्रेंड नाताशा पूनावालाशी रणबीर कपूरची जवळीक वाढल्याच्या चर्चा आहेत. हे दोघं अनेकदा एकत्र दिसल्यानं सगळीकडे या दोघांची चर्चा होतेय.

Fitness बाबत बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याकडून प्रेरित आहे अर्जुन कपूर

 

View this post on Instagram

 

Lunching on the stage of Theatro La Scala #casualfriday 😅

A post shared by Natasha Poonawalla (@natasha.poonawalla) on

रणबीर कपूर आणि करिनाची फ्रेंड नताशा मागच्या काही दिवसांपासून एकत्र दिसत आहेत. दोघांनाही बी-टाऊनचे BFF म्हटलं जात आहे. या दोघांमधील केमिस्ट्री लोकांमध्ये चर्चेचा ठरत आहे. नताशा पूनावाला ही करिना कपूरच्या बेस्ट फ्रेंड पैकी एक आहे. नताशा अनेकदा करिनाच्या पार्टीजमध्येही दिसते.

VIDEO : महिलाच्या सद्यस्थितीवर आराध्यानं दिलं भाषण, अमिताभ बच्चनही झाले हैराण

अशात आता तिची मैत्री करिनाचा चुलत भाऊ रणबीरसोबत घट्ट होत आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चा जास्त होत आहेत. नताशा पूनावाला बिलेनियर आदर पूनावालाची पत्नी आहे. तसेच ती एक सोशियलाइट आणि फॅशनिस्टा सुद्धा आहे. ज्यामुळे तिचे बॉलिवूडच्या कलाकारांशी मैत्रीचे संबंध आहेत.

रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो आलियासोबत त्यांचा आगामी सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे आणि आलियाचे वाराणसी घाटावरील शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

VIRAL VIDEO : फोटोग्राफरनं म्हटलं ‘दीपू जी’, अशी होती दीपिकाची प्रतिक्रिया

First Published: Dec 23, 2019 01:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading