मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मलायका आणि अर्जुन एकमेकांसोबत असताना करीना कपूरला पडला भलताच प्रश्न...

मलायका आणि अर्जुन एकमेकांसोबत असताना करीना कपूरला पडला भलताच प्रश्न...

बॉलिवूडचे लव्हबर्ड्स मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या गोव्यामध्ये एकत्र आहेत. त्यावेळी करीनाने कपूर (Kareena Kapoor) त्यांना भलताच प्रश्न विचारला.

बॉलिवूडचे लव्हबर्ड्स मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या गोव्यामध्ये एकत्र आहेत. त्यावेळी करीनाने कपूर (Kareena Kapoor) त्यांना भलताच प्रश्न विचारला.

बॉलिवूडचे लव्हबर्ड्स मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या गोव्यामध्ये एकत्र आहेत. त्यावेळी करीनाने कपूर (Kareena Kapoor) त्यांना भलताच प्रश्न विचारला.

मुंबई, 02 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या गोव्यामध्ये(Goa) नववर्षाचे स्वागत करत आहे. आपल्या कुटुंबाबरोबर आणि जवळच्या मित्रांबरोबर ती गोव्यामध्ये असून तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर (Arjun Kapoor) देखील तिच्यासोबत आहे. नववर्ष साजरे करताना तिने आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बरोबरचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अपलोड केला आहे. हा फोटो अपलोड केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया येत असून तिची मैत्रीण करीना कपूरने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोमध्ये मलायका आणि अर्जुन सेक्सी दिसत असून यामध्ये अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याने प्रिंटेड शर्ट घातला आहे तर मलायकाने शिमरी पॅंटसूट (Shimmery pantsuit) घातला आहे. याचबरोबर तिने कमेंटमध्ये नवीन वर्ष, नवीन दिवस असं कॅप्शन दिलं आहे. त्यावर करीना कपूर(Karena Kapoor)ने तुम्ही दोघंही माझे लाडके आहात असं म्हणत 'आजचा मेन्यू काय आहे' अशी कमेंट केली. त्यामुळे करीना कपूर किती फुडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

करीना कपूर हिच्याबरोबरच कृती सॅनन (Kriti Sanon), अंशुला कपूर, संजय कपूर आणि महिप कपूर यांनीदेखील यावर हृदयाची ईमोजी पोस्ट करत केली होती. गोव्यामध्ये अर्जुन आणि मालयकाबरोबरच तिची बहीण अमृता अरोरा देखील आहे. जोडपे गोव्यामध्ये नवीन वर्षाचे  सेलिब्रेशन करत असून मलायका अनेकदा आपले हॉट फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते.

दरम्यान, मागील आठवड्यात मालयकाने आपले स्विमिंग पुलमधील काही फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले होते. त्यावेळी तिने 2020 ला गुडबाय, येणारे वर्ष सर्वांना चांगले जावे अशी आशा असे कॅप्शन दिले होते.

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) त्यांच्या आगामी भूत पोलीस या सिनेमाचे हिमाचलमध्ये शूटिंग करत होते. त्यावेळी  मलायका आणि अर्जुन कपूर यांनी करीना आणि सैफ यांच्याबरोबर धर्मशाळामध्ये दिवाळी साजरी केली होती. करीना कपूरच्या नववर्ष सेलिब्रेशनविषयी बोलायचे झाल्यास तिने आपल्या पतीसह आणि कुटुंबियांसह नववर्ष साजरे केले.

First published:
top videos

    Tags: Arjun kapoor, Kareena Kapoor, Malaika arora