मुंबई 20 जुलै: आषाढी वारीनिमित्त (Aashadhi Vari) अनेक भक्तगण हरिनामात तल्लीन झाले आहेत. विविध पद्धतीने ते विठूरायाला नमन करत आहेत. त्यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अनेकांनी वारकरी वेश धारण करत फोटो शेअर केले तर काहींनी सुंदर व्हिडीओ पोस्ट केले. झी मराठी (Zee Marathi) वाहिनी वरील 'कारभारी लयभारी' (Karbhari Laybhari) मालिकेतील कारभारी म्हणजेच अभिनेता निखिल चव्हाणने (Nikhil Chavan) एक सुंदर वारी रॅपवर (Vari Rap) व्हिडीओ शेअर केला आहे.
निखिलने सुंदर वारकरी वेशात हा व्हिडीओ शुट केला आहे. हरिनामाचा गजर असणारा हा रॅप सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. निखिलने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर अनेकांनी यावर कमेंट्स आणि लाइक्स केले आहेत.
View this post on Instagram
विठ्ठल विठ्ठल! विठोबा - रखुमाई घेऊन दिपाली सय्यद हरिनामात झाली दंग
‘कारभारी लयभारी’ (Karbhari Laybhari) मालिकेनंतर अभिनेता निखिल चव्हाण (Nikhil Chavan) चांगलाच प्रकाशझोतात आला होता. सध्या मालिकेत तो लवकरच मंत्री होत आहे. तर पियु आणि राजवीर आता खरेखुरे कारभारी होणार आहेत. तर यांनतर राजवीर राजकारणातील काराभारी ही होणार आहे.
'नवराई माझी लाडाची लाडाची गं' वैद्यंच्या सुनेचं सासूबाईंनी असं केलं स्वागत; पाहा VIDEO
दरम्यान मालिका निरोप घेणार असल्याच्या चर्चा ही समोर येत आहेत. तर झी मराठीवर नव्या मालिका येत आहेत. त्यामुळे ‘कारभारी लयभारी’ मालिका संपणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेलं. ‘ती परत येतेय’ (Ti Parat Yetey) ही नवी मालिका झी मराठीवर सुरू होत आहे. तर मालिकेची वेळ रात्री 10:30 ची असणार आहे. त्यामुळे आता नक्की कोणती मालिका बंद होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.