VIDEO: “माझ्या पार्वती, लक्ष्मी, सरस्वती” करणवीर बोहराने केलं तिसऱ्या मुलीचं अनोखं स्वागत

VIDEO: “माझ्या पार्वती, लक्ष्मी, सरस्वती” करणवीर बोहराने केलं तिसऱ्या मुलीचं अनोखं स्वागत

गुमराह, बिग बॉस, शरारत अशा मालिकांमध्ये झळकलेला करणवीर बोहरा (Karanvir Bohra) बाबा झाला आहे. इन्स्टाग्रामवरुन व्हिडीओ शेअर करत त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर: अभिनेता करणवीर बोहरा (Karanvir Bohra) पुन्हा एकदा बाबा झाला आहे. त्याच्या घरात मुलगी जन्माला आली आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. आपल्या तिन्ही मुलींसोबत तो अतिशय आनंदात दिसत आहे. तुम्हाला बहीण मिळाली असं तो आपल्या दोन्ही मुलींना सांगत आहे. करणवीर बोहराला 2 जुळ्या मुली आहेत. नुकतीच त्याच्या घरी मुलगी जन्माला आली आहे.

करणवीर बोहराने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हिडीओ  शेअर याबद्दल माहिती दिली. ‘मी आता 3 मुलींचा बाप झालो आहे. या आनंदापेक्षा मोठं अजून काहीच असू शकत नाही असं तो म्हणाला. या तीन राण्या जगावर राज्य करतील. हे देवा माझ्या आयुष्यात देवदुतासारखी ही लेक आणल्याबद्दल तुझे आभार. मी तिघींची पूर्ण काळजी घेईन. कारण त्या माझ्या 3 देव्या आहेत. #पार्वती #लक्ष्मी #सरस्वती’ असं कॅप्शन त्याने दिलं आहे. करणवीरच्या या व्हिडीओला 2 तासातंच 33 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. त्याचे चाहते त्याला भरभरुन शुभेच्छा देत आहेत. करणवीर बोहरा आणि टीजे सिद्धूचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं. लॉकडाऊनमध्ये सिद्धू आणि करणवीरने त्यांच्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याबद्दल जाहीर केलं होतं. 2016 मध्ये करणवीरला बेला आणि विएना या जुळ्या मुली झाल्या होत्या. तो नेहमीच त्याच्या मुलींसोबत व्हिडीओ शेअर करत असतो.

करणवीर बोहरा आजपर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकला आहे. शरारत, गुमराह, बिग बॉस, नागिन या मालिकांमध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर किस्मत कनेक्शन, लव्ह यू सोनिये, तेजा, हमे तुमसे प्यार कितना, पटेल कीं पंबाजी शादी, केमिस्ट्री, कसिनो अशा चित्रपटांमध्येही तो झळकला आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 21, 2020, 1:31 PM IST

ताज्या बातम्या