मुलगा हवा होता का? असा प्रश्न विचारणाऱ्यांना करणवीर बोहराची सणसणीत चपराक
तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर करणवीर बोहराच्या (Karanveer Bohra) पेजवर अनेक 'तुला मुलगा हवा होता का?' असे प्रश्न काहींनी विचारले. असे प्रश्न विचारणाऱ्या लोकांना त्याने सणसणीत उत्तर दिलं आहे.
मुंबई, 24 डिसेंबर: अभिनेता करणवीर बोहराच्या (Karanvir Bohra) घरी नुकतीच मुलगी जन्माला आली आहे. मुलीच्या जन्माची बातमी देणारा एक व्हिडीओ त्याने नुकताच शेअर केला होता. या व्हिडीओला भरपूर व्ह्यूज आले होते. अनेक नेटकऱ्यांनी करणवीर आणि त्याच्या बायकोचं अभिनंदनही केलं होतं. ‘हे देवा माझ्या आयुष्यात देवदुतासारखी ही लेक आणल्याबद्दल तुझे आभार. मी तिघींची पूर्ण काळजी घेईन. कारण त्या माझ्या 3 देव्या आहेत. #पार्वती #लक्ष्मी #सरस्वती’ असं कॅप्शन त्याने दिलं होतं.
करणवीरच्या घरी तिसरी मुलगी जन्माला आल्यानंतर अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं पण काहींनी त्याला प्रश्न विचारले की, ‘तुला मुलगा हवा होता का?’ ‘तू मुलासाठी प्रयत्न करत होतास का?’ या प्रश्नांवर करणवीर बोहराने एक पोस्ट शेअर करत मत व्यक्त केलं आहे. ‘माझ्या इन्स्टाग्राम पेजवर अनेक मेसेज आले होते अनेकांनी मला विचारलं की 2 मुलींच्या जन्मानंतर तू मुलासाठी प्रयत्न करत होतास का? पण या सगळ्या अफवा आहेत. मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत नव्हतो. आम्ही छान तंदुरुस्त बाळासाठी प्रयत्न करत होतो. मी जरी एका मारवाडी कुटुंबात जन्माला आलो असलो तरी आमच्याकडे लिंगभेद कधीही करण्यात आला नाही. माझ्या मुलीसाठी माझ्या आयुष्यात महत्वाचं स्थान आहे.’
करणवीर बोहरा आजपर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकला आहे. शरारत, गुमराह, बिग बॉस, नागिन या मालिकांमध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर किस्मत कनेक्शन, लव्ह यू सोनिये, तेजा, हमे तुमसे प्यार कितना, पटेल कीं पंबाजी शादी, केमिस्ट्री, कसिनो अशा चित्रपटांमध्येही तो झळकला आहे.