VIDEO : 'या' हिरोनं मलायका अरोराला दिला धोका, त्यानंतर म्हटलं 'बहनजी'

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये या अभिनेत्यानं मलायकाला बहनजी म्हटलेलं पाहून सर्वच अवाक झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 01:34 PM IST

VIDEO : 'या' हिरोनं मलायका अरोराला दिला धोका, त्यानंतर म्हटलं 'बहनजी'

मुंबई, 29 जुलै : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. नुकतीच तिनं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स शो डान्स इंडिया डान्स या टीव्ही शोमध्ये हजेरी लावली. हा शो नेहमीच त्यांच्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे चर्चेत असतो. शोमध्ये होणारी मस्करी सुद्धा अनेकदा चर्चेत असते. आताही काहीसं असंच झालं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये शो होस्ट करण वाही मलायकाला बहनजी असं म्हणताना दिसत आहे.

सुबोध भावे नाटकात काम करणार नाही? या कारणानं संताप अनावर

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये करणनं मलायकाला बहनजी म्हटलेलं पाहून सर्वच अवाक झाले आहेत. वयाच्या 45 व्या वर्षीही चांगला फिटनेस आणि ग्लॅमरस दिसणाऱ्या मलायकाला करण बहनजी कसा काय म्हणू शकतो असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या व्हिडिओमध्ये करण सुरुवातीला मलायकाला सांगतो की, त्याला तिला काहीतरी द्यायचं आहे. त्यानंतर तो तिच्या जवळ जातो आणि तिला हात पुढे करायला सांगतो आणि मग स्वतःच्या हातावर किस करून ते मलायकाच्या हातात देतो. असं करताना तो मलायकाला म्हणतो, ‘मना मत करना बहनजी’ करणनं मलायकाला बहनजी म्हटल्यावर ती सुद्धा त्याच्याकडे अविश्वासानं पाहू लागते.

कार्तिक आर्यनसोबत बाइकवर बसण्यासाठी सारा अली खान घेते पैसे? VIDEO VIRAL

Loading...

यानंतर मलायकाला समजावताना करण म्हणतो, जसं लग्नात मोठी माणसं शगून देतात आणि म्हणतात ना की, ठेव नाही म्हणू नको. तसंच मी पण सांगतो. त्यानंतर करण सांगतो की हे किस सैफच्या बेगमला नेऊन दे. त्यावर मलायका विचारते आता तर मला दिलं होतं मग अचानक बदललं कसं. म्हणजे मलायकाला गिफ्ट तर मिळालं नाहीच उलट बहनजी म्हटलेलं ऐकून घ्यावं लागलेलं दिसत आहे.

या २ लग्न करणाऱ्या ‘खलनायका’मुळे माझं लग्न राहिलं - सलमानचा गौप्यस्फोट

==========================================================================

'...यावर एकच उपाय नाटकात काम न करणं', का भडकला सुबोध भावे? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 12:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...