मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Karan Mehra: 'ज्या भावाने कन्यादान केलं त्याच्यासोबतच आता अफेयर',करण मेहराचा पत्नी निशा रावलवर गंभीर आरोप

Karan Mehra: 'ज्या भावाने कन्यादान केलं त्याच्यासोबतच आता अफेयर',करण मेहराचा पत्नी निशा रावलवर गंभीर आरोप

 काही महिन्यांपूर्वी करणची पत्नी निशा रावलने अभिनेत्यावर आणि त्याच्या कुटुंबावर अतिशय गंभीर आरोप केले होते. त्यांनतर आता मौन सोडत अभिनेत्याने आपली बाजू मांडली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,9 ऑगस्ट-   'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून नैतिकच्या रुपात अभिनेता करण मेहरा घराघरात पोहोचला होता. मालिकेत शांत-सरळ, समजूतदार आणि आदर्श पती असणाऱ्या नैतिकच्या खऱ्या आयुष्यात मात्र मोठी खळबळ माजली आहे. काही महिन्यांपूर्वी करणची पत्नी निशा रावलने अभिनेत्यावर आणि त्याच्या कुटुंबावर अतिशय गंभीर आरोप केले होते. त्यांनतर आता मौन सोडत अभिनेत्याने आपली बाजू मांडली आहे. इतकंच नव्हे तर आपल्या पत्नीचं भावासोबतच विवाहबाह्य संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

नुकतंच अभिनेता करण मेहराने मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेदरम्यान करणने अनेक धक्कादायक खुलासे करत सर्वानांच चकित केलं आहे. मात्र अभिनेत्याच्या एका दाव्याने सर्वानांच धक्का बसला आहे. अभिनेत्याने मीडियाशी संवाद साधत सांगितलं की, निशा रावलचं भावासोबतच प्रेमप्रकरण सुरु आहे. वास्तविक निशा रावलचं तिच्या मानलेल्या भावासोबतचं अफेयर असल्याचं करणचं म्हणणं आहे. या गोष्टीने सर्वच चकित झाले आहेत.

निशा रावलचा रोहित साथिया हा व्यक्ती मानलेला भाऊ आहे. करणने सांगितलं की जी व्यक्ती निशाकडून गेली १४ वर्षे माझ्या डोळ्यांसमोर राखी बांधून घेत होती. त्याच व्यक्तीसोबत आज ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते.इतकंच नव्हे तर निशा करणच्याच घरी सध्या रोहितसोबत राहात आहे. आपल्या मुलालासुद्धा भेटू देत नसल्याचं दुःख करणने यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे.

" isDesktop="true" id="743661" >

(हे वाचा:Taapasee Pannu: प्रमोशनदरम्यानच तापसी आणि पापाराझींमध्ये सुरु झाला वाद; नंतर जे घडलं.., पाहा VIDEO )

काही महिन्यांपूर्वी करण मेहरा आणि निशा रावल यांचं भांडण मीडियासोर आलं होतं. यावेळी निशाने मीडियासमोर करण मेहरावर गंभीर आरोप लावत, आपल्याला मारहाण आणि शारीरिक छळ होत असल्याचं म्हटलं होतं. या सर्व आरोपांना करण मेहराने फेटाळून लावलं होतं. तेव्हापासून हे दोघेही विभक्त राहात आहेत.

First published:

Tags: Entertainment, Tv actors, Tv actress