• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'Student of The Year' ची 9 वर्षे पूर्ण! करण जोहरने शेअर केला खास VIDEO

'Student of The Year' ची 9 वर्षे पूर्ण! करण जोहरने शेअर केला खास VIDEO

9 ऑक्टोबर 2012 रोजी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक करण जोहर यांनी बॉलिवूडला तीन नवीन 'विद्यार्थी' दिले होते.

 • Share this:
  मुंबई, 19ऑक्टोबर- आजचा दिवस करण जोहर(Karan Johar) आणि बॉलिवूडच्या ३ कलाकरांसाठी फारच खास आहे. 9 ऑक्टोबर 2012 रोजी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक करण जोहर यांनी बॉलिवूडला तीन नवीन 'विद्यार्थी' दिले होते. आणि तेव्हापासून हे तिघेही सातत्याने उत्तम कामगिरी करत आहेत. आज आलिया भट्ट(Alia Bhatt), वरुण धवन (Varun Dhavan) आणि सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Mlhotra) ​​यांचा 'स्टुडंट ऑफ द इयर' (Student Of The Year) रिलीज होऊन नऊ वर्षे झाली आहेत. हा चित्रपट नुकताच रिलीज झाल्यासारखं वाटतं मात्र आज त्याला तब्बल ९ वर्षे (9 Year Completed) झाली आहेत. वेळ अगदी वेगाने निघून जातो हेचं खरं आहे. करण जोहरने केली खास पोस्ट- 'ऑक्टोबर हा फक्त भेटवस्तूंनी भरलेला असतो - आणि #SOTY हे असच एक गिफ्ट आहे! हे केवळ प्रत्येकाचं नृत्य किंवा गुंजारणे, अनेक शैली, जी कालबाह्य आहेत आणि माझ्या बर्‍याच आठवणींना उजाळा देत असतात असं नाही! परंतु यातील अंतिम भेटवस्तू हे तीन विद्यार्थी आहेत, हे सुपरस्टार जे चित्रपट क्षेत्रासाठी आज पले निरपेक्ष सर्वोत्तम योगदान देत आहेत! यापेक्षा अधिक अभिमानास्पद दुसरं काही असू शकत नाही आणि आणि या चित्रपटासाठीही.'.
  View this post on Instagram

  A post shared by Karan Johar (@karanjohar)

  'स्टुडंट ऑफ द ईयर' या चित्रपटाने तरुणाईला वेड लावलं होतं.करण जोहरचा हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. आणि तो त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. नवोदित आलिया, वरुण आणि सिद्धार्थ व्यतिरिक्त या चित्रपटात ऋषी कपूर, रोनित रॉय, राम कपूर, गौतमी कपूर, साहिल आनंद, सना सईद आणि फरीदा जलाल यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. या तगड्या स्टारकास्ट मुळे या चित्रपटात चार चाँद लागले होते. चित्रपटातील प्रत्येक गाणं सुपरहिट ठरलं होतं. आलिया, वरुण आणि सिद्धार्थची केमिस्ट्री या चित्रपटात चांगलीच पसंत केली गेली होती. आत्तापर्यंत आलिया-वरुण आणि आलिया-सिद्धार्थची जोडी अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. (हे वाचा:हृतिक रोशनने वाढदिवसादिवशीच उडवली कुणाल कपूरची खिल्ली; शॉर्ट्सवर दिली कमेंट्) आलिया-वरुणची केमेस्ट्री- १)'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चित्रपटात आलियाने अंबाला येथील एका मुलीची भूमिका साकारली होती, तर वरुणने तिच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. तसेच दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लानेNRI अंगदची व्यक्तिरेखा साकारली होती. दिग्दर्शक शशांक खेतान दिग्दर्शित हा चित्रपट सुपरहिट ठरला.तसेच चित्रपटातील गाणीही प्रचंड पसंत करण्यात आली होती. २)2017 मध्ये पुन्हा एकदा दिग्दर्शक शशांक खेतान, वरुण धवन आणि आलिया भट्ट या त्रिकुटाने 'बद्रीनाथ की दुल्हनिया' हा चित्रपट आपल्या भेटीला आणला होता. या चित्रपटात आलिया भट्ट एअर होस्टेस बनण्याची इच्छा असलेल्या वैदेही त्रिवेदीच्या भूमिकेत होती. तर वरुण धवन त्याचा प्रेमी बद्रीनाथ बसलच्या भूमिकेत होता. हा चित्रपटही हिट ठरला.हा चित्रपट 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'चा सिक्वल होता. ३)आलिया भट्ट आणि वरुण धवन या हिट जोडीचा तिसरा चित्रपट होता अभिषेक वर्मनचा 'कलंक'. या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही भूमिका होत्या. तगडी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही. (हे वाचा:Anushka Sharma च्या हृदयात नेमकं कोण? My whole heart म्हणत शेअर केला फोटो) सिद्धार्थ-आलिया केमेस्ट्री- 'स्टुडंट ऑफ द इयर' व्यतिरिक्त आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी 'कपूर अँड सन्स' चित्रपटात एकत्र काम केले आहे. याशिवाय ऋषी कपूर, रत्ना पाठक शाह, रजत कपूर आणि फवाद खान हे देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि फॉक्स स्टार स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली होती.
  Published by:Aiman Desai
  First published: