Home /News /entertainment /

VIDEO : करण जोहरला कंटाळला आहे त्याचा मुलगा यश, 'कोरोना' आहे कारण

VIDEO : करण जोहरला कंटाळला आहे त्याचा मुलगा यश, 'कोरोना' आहे कारण

इन्स्टाग्रामवर नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये यशने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला बोरिंग म्हटलं आहे

  मुंबई, 06 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये चित्रपटांचं शूटिंग थांबलं आहे, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे गेल्या आहेत. यामुळे सिनेसृष्टीतील दिग्गज त्यांच्या कुटुंबीयांबरोबर अधिक काळ घालवत आहेत. होम क्वारंटाइनमध्ये असल्यामुळे अनेकांना कुटुबाला देत येत नसलेला वेळ देण्याची ही संधी मिळाली आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) सुद्धा त्याच्या मुलांबरोबर वेळ घालवतो आहे. यामध्ये त्याचा जरी विरंगुळा होत असला, तरी त्याचा मुलगा मात्र घरी राहुन कंटाळला आहे आणि तो त्याच्या वडिलांना म्हणजेच 'कुल करण जोहर'ला बोरिंग म्हणत आहे. (हे वाचा-प्रेक्षकासांठी पर्वणी! 'साराभाई vs साराभाई', 'खिचडी' देखील पुन्हा होणार प्रसारित) करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. करण त्याचा मुलगा यश आणि मुलगी रूही यांच्याबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. या दरम्यान तो काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर देखील करत आहे. त्याने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये यशने करणला बोरिंग म्हटलं आहे. एकदम आश्चर्यचकित होऊन करणने का असा प्रश्न विचारल्यावर यश ने असं उत्तर दिलं की, 'कारण कोरोना आला आहे.' हे उत्तर ऐकुन करणला देखील हसू आवरलं नाही.
  View this post on Instagram

  I am very boring! Apparently! #lockdownwiththejohars

  A post shared by Karan Johar (@karanjohar) on

  करणने याआधीही रुही आणि यशचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये करणची मुलं त्याच्या क्लोजेटमधील एका चित्राला शाहरुख खान समजत होते. रुही आणि यश दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Karan Johar

  पुढील बातम्या