करण जोहरच्या 'तख्त'चा रॉयल अंदाज! एवढ्या मोठ्या स्टारकास्टमध्ये कोण ठरणार वरचढ?

करण जोहरच्या 'तख्त'चा रॉयल अंदाज! एवढ्या मोठ्या स्टारकास्टमध्ये कोण ठरणार वरचढ?

करण जोहरचा असाच एक ‘रॉयल’ सिनेमा 2021मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘तख्त’ हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तख्त’चं मोशन पोस्टर (Motion Poster) नुकतच करण जोहरने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 1 फेब्रुवारी : तगडी स्टारकास्ट आणि झगमगाट असणारे सेट, हे करण जोहरच्या सिनेमाचं वैशिष्ट्य असतं. करण जोहरचा असाच एक ‘रॉयल’ सिनेमा 2021मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘तख्त’ हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तख्त’चं मोशन पोस्टर (Motion Poster) नुकतच करण जोहरने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलं आहे. करणने ‘Principal photography begins in March’ असं कॅप्शन दिलं आहे.

करण जोहर दिग्दर्शित या सिनेमामध्ये रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट, विकी कौशल, भूमि पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. करण जोहर, हिरू यश जोहर आणि अपुर्वा मेहता या सिनेमाची निर्मिती करत आहेत.

तसंच करणने 'तख्त'च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. 25 डिसेंबर 2021ला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

एवढी मोठी स्टारकास्ट आणि करण जोहरचं दिग्दर्शन असल्यामुळे तिकीटबारीवर हा सिनेमा चांगलीच कमाई करेल अशी खात्री सिनेरसिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

First published: February 1, 2020, 7:51 PM IST

ताज्या बातम्या