फेव्हरेट Bollywood Wife म्हणून करण जोहर ट्रोल; दिग्दर्शकाच्या उत्तराने सगळ्यांची बोलती बंद

‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईव्स’ (Fabulous Lives of Bollywood Wives) या वेब सीरिजनंतर करण जोहर (Karan Johar) ट्रोल होत आहे. करणनेही ट्रोलर्सना भन्नाट उत्तर दिलं आहे.

‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईव्स’ (Fabulous Lives of Bollywood Wives) या वेब सीरिजनंतर करण जोहर (Karan Johar) ट्रोल होत आहे. करणनेही ट्रोलर्सना भन्नाट उत्तर दिलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 30 नोव्हेंबर: ‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईव्स’ (Fabulous Lives of Bollywood Wives) ही वेब सीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजमध्ये बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांच्या बायकांचं आयुष्य कसं असतं हे दाखवलं आहे. या सीरिजच्या नावावरुन आधीच वाद झाला होता. आता चाहत्यांनी या सीरिजचा दिग्दर्शक आणि निर्मात असलेल्या करण जोहरला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. करण जोहरनेही (Karan Johar) या ट्रोलर्सना तेवढीच भन्नाट उत्तरं दिली आहेत. एका ट्रोलरने लिहीलं आहे की, ‘मला वाटतं की बॉलिवूडच्या पत्नींपैकी सर्वात आवडती पत्नी करण जोहर आहे. आणि माझ्या मताशी सगळेच जण सहमत असतील’ असं लिहीत या ट्रोलरने करण जोहरला टॅग केलं आहे. या व्यक्तीचं नाव डॉक्टर अखिलेश गांधी असं आहे. आता या सगळ्यावर करण जोहर भडकेल अशी अपेक्षा होती. पण हा ट्रोलर करण जोहरच्या अंगावर येताच करणने त्याला शिंगावर घेतलं आहे. करणने त्याला उत्तर दिलं, ‘हो का ठीक आहे. मला खूपच हसायला आलं. एखाद्या ट्रोलरला सेंन्स ऑफर ह्यूमर आहे हे बघून मजा आली. धन्यवाद डॉक्टर.’ करण जोहर नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरुन ट्रोल होत असतो. कधी त्याच्या कपड्यांवरुन तर कधी त्याच्या गे  असल्याच्या चर्चांवरुन. त्याला ट्रोल केलं जातं. सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शकांवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. त्यातला एक करण जोहरही होता.
    Published by:Amruta Abhyankar
    First published: