'लस्ट स्टोरीज' नंतर हे टॉप 4 फिल्ममेकर्स घेऊन येतायत Ghost Stories

'लस्ट स्टोरीज' नंतर हे टॉप 4 फिल्ममेकर्स घेऊन येतायत Ghost Stories

लस्ट स्टोरीजच्या यशानंतर निर्माता करण जोहर, झोया अख्तर, दिवाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप यांनी पुन्हा एकदा एकत्र येत नव्या प्रोजेक्टची तयारी सुरू केली आहे.

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट : Netflix वरील 2018 मध्ये आलेला सिनेमा लस्ट स्टोरीजच्या यशानंतर निर्माता करण जोहर, झोया अख्तर, दिवाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप यांनी पुन्हा एकदा एकत्र येत नव्या सिनेमाची तयारी सुरू केली आहे. लस्ट स्टोरीजनंतर यावेळी ते घोस्ट स्टोरीज अर्थात भूतांच्या गोष्टी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सुत्राच्या माहितीनुसार प्रत्येक दिग्दर्शक आपप्लाय स्टोरीचं स्वतंत्र शूट करणार असून त्यानंतर हे सर्व एकत्र नेटफ्लिक्सवर रिलीज केलं जाईल. ‘घोस्ट स्टोरीज’ हे नेटफ्लिक्स आणि SRVP यांच्यातील एकत्र असा तिसरा प्रोजेक्ट आहे. घोस्ट स्टोरीजचं प्रोडक्शन रॉनी स्क्रुवाला आणि SRVP करणार आहेत.

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं याबाबत ट्विटरवर लिहिलं, ‘आम्ही चौघंही पुन्हा एकदा तुमच्यासाठी काहीतरी नवं घेऊन येण्यासाठी तयार झालो आहोत. #GhostStories लवकरच नेटफ्लिक्सवर तुमच्या भेटीला येत आहे.’

लाखो रुपये खर्च करून ‘या’ ठिकाणाहून जेवण ऑर्डर करतात बॉलिवूड स्टार्स

करणच्या या ट्वीटनंतर नेटफ्लिक्स इंडियानं त्याच्या या ट्वीटवर गंमतीशीर कमेंट केली आहे. त्यांनी लिहिलं, ‘आम्ही असं म्हणू शकतो का? ‘कभी खुशी कभी घोस्ट’ करण प्लिज?’

रस्त्यावरच्या महिलेचं हे गाणं ऐकून तुम्हाला येईल लतादीदींची आठवण

इंडियन एक्सप्रेसनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘नेटफ्लिक्स सोबत काम करत असल्याचा खूप आनंद वाटतो आहे. अशाप्रकारच्या घोस्ट स्टोरीजवर काम करायला मी खूपच उत्सुक आहे.’ अशी प्रतिक्रिया झोया अख्तरनं दिली. तर अनुराग कश्यप म्हणाला, यावेळी हे थोडं आव्हानात्मक आहे. कारण भयपटात नेहमीच कॉमेडीचा वापर केला जातो. मात्र यावेळी याला अपवाद असणार आहे. घोस्ट स्टोरीजसाठी मी खूप उत्साहित आहे.

Love Breakups Zindagi ! आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा घटस्फोट

=======================================================================

दोस्ती आहे ना भाऊ! उंदीर आणि मांजराचा मस्तीचा VIDEO व्हायरल

First published: August 1, 2019, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading