शाहरुखच्या लेकाच्या वाढदिवसाला करण जोहरनं 'अशा' दिल्या शुभेच्छा

बाॅलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा आज वाढदिवस. बाॅलिवूड सितारे त्याला शुभेच्छा देतायत.

News18 Lokmat | Updated On: Nov 13, 2018 02:35 PM IST

शाहरुखच्या लेकाच्या वाढदिवसाला करण जोहरनं 'अशा' दिल्या शुभेच्छा

मुंबई, 13 नोव्हेंबर : बाॅलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा आज वाढदिवस. बाॅलिवूड सितारे त्याला शुभेच्छा देतायत. आर्यन अमेरिकेत फिल्म मेकिंग शिकतोय. त्यामुळे तो किंग खानच्या दिवाळी पार्टीतही हजर नव्हता. शाहरुखनं ट्विट करून आपण लेकाला किती मिस करतोय हे सांगितलं होतं.


करण जोहर शाहरुखच्या कुटुंबाचाच मित्र. त्यानं ट्विट करून आर्यनला शुभेच्छा दिल्यात. करणनं लिहिलंय, आर्यन 21 वर्षांचा झाला यावर मला विश्वास बसत नाही. त्याचा जन्म झाला तेव्हा पहिल्यांदा मला पालक झाल्याची भावना दाटून आली. आर्यन तुला शुभेच्छा. तुला चांगले आई-वडील मिळालेत.


आर्यन लहानपणी सिनेमात आलाय. पापा शाहरुखच्या 'कभी खुशी कभी गम'मध्ये तो लहान शाहरुख बनला होता. मध्यंतरी करण जोहर आर्यन आणि खुशी यांना लाँच करणार अशी बातमी होती.

Loading...


करण जोहर खुशीसाठी योग्य पटकथेच्या शोधात आहे. सोशल मीडियावर खुशीची फॅन फॉलॉईंग वाढत चाललीये. खुशी आणि आर्यन यांना एकत्र लाँच करुन करण जोहर बॉलिवूडमध्ये नक्कीच धमाका करतील असं तरी दिसतंय.


कलाक्षेत्रातील नामवंत कुटुंबातील खुशी आणि आर्यन त्यांच्या कुटुंबाचा वारसा पहिल्या चित्रपटातून पुढे नेतील ह्याचीच उत्सुकता सगळ्यांना असेल.


शाहरूख खानची मुलगी सुहानाही आता बाॅलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहेच. त्यात आता आर्यन खानही येतोय. आता पुढच्या काळात ही सेलिब्रिटीजची मुलं सिनेरसिकांना चांगली ट्रीट देतील, असं वाटतंय.


दिवाळीत शाहरुखनं सगळ्यांना पार्टी दिली. शाहरुख पत्नी गौरी, मुलगी सुहाना आणि धाकटा मुलगा अब्रामसोबत फोटो पोस्ट केला. 'अरे यार मिसिंग लिटिल आर्यन', असं लिहित शाहरुखनं त्याच्यातल्या भावुक पित्याचं दर्शन चाहत्यांना घडवलं.अमेरिकेत गेलेली शनाया दिवसभर काय करते?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 02:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...