जेव्हा 'गे' म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला होता करण जोहर, सडेतोड उत्तर देत केली बोलती बंद

जेव्हा 'गे' म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला होता करण जोहर, सडेतोड उत्तर देत केली बोलती बंद

अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात करणाऱ्या करणनं नंतर निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत त्यात प्रचंड यशही मिळवलं. मात्र अनेकदा त्याला त्याच्या लैंगिकतेवरून ट्रोल व्हावं लागतं.

  • Share this:

मुंबई, 12 जून : करण जोहर हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्व मानलं जातं. अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात करणाऱ्या करणनं नंतर निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत त्यात प्रचंड यशही मिळवलं. तसेच अनेक नव्या कलाकारांना ही त्यानं लॉन्च सुद्धा केलं. मात्र अनेकदा त्याला त्याच्या लैंगिकतेवरून ट्रोल व्हावं लागतं. अनेकदा करण या सर्व गोष्टीवर दुर्लक्ष करताना दिसतो. पण मागच्या वर्षी एका युजरनं अशाप्रकारे त्याला ट्रोल करायचा प्रयत्न केला त्यावर मात्र करणनं त्याला सडेतोड उत्तर दिलं. ज्यामुळे त्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं गेलं होतं.

करणला एका युजरनं ट्विटर एक पोस्ट करत ट्रोल करायचा प्रयत्न केला होता. त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, करण तुझ्यावर एक सिनेमा तयार करायला हवा, 'करण जोहर : द गे' हे ट्वीट पाहिल्यावर करण जोहर भडकला. पण तरीही त्यानं संयम राखत या युजरला उपरोधिक शब्दात सडेतोड उत्तर दिलं. करणनं त्याच्या ट्वीटला रिप्लाय देताना लिहिलं, 'तू खरंच जिनिअस आहेस. या विषयी ट्विटरवरून आवाज उठवल्याबद्दल तुझे आभार' करणच्या या ट्वीटनंतर इतर अनेक ट्वीटर युजर्सनी त्याला पाठिंबा दिला.

करणला ट्रोल करण्याचा या युजरचा प्लान पुरता फसलेला दिसून आला कारण त्याच्या या ट्वीटला करणनं उत्तर दिल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्या युजरलाच ट्रोल करायला सुरुवात केली आणि करण जोहर मात्र अशा फालतू लोकांकडे तू लक्ष देऊ नकोस असा सल्ला सुद्धा दिला. एका युजरनं लिहिलं, चाहत्यांनी सध्या शिस्त शिकण्याची गरज आहे. करण तू अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. याशिवाय अरबाज खानच्या पिंच बाय अरबाज खान या चॅट शोमध्ये करणनं तो त्याच्या ट्रोलर्सना कसं सामोरं जातो हे सांगितलं होतं.

अरबाज खानच्या चॅट शोमध्ये करणला त्याच्या ट्रोलर्स विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना करण म्हणला, मी जेव्हा अशा नकारात्मक कमेंट वाचतो त्यावेळी मला खूप दुःख होतं. राग येतो. जेव्हा मी सकाळी उठतो आणि पाहतो तर लोक मला सोशल मीडियावर शिव्या देत असातात. जसं की मी काही चुकीचं केलं आहे. ते माझ्याशी बोलू शकतात मात्र त्यांनी अशा कमेंट करायला नको जसं मी एखाद्या आजारानं पीडीत आहे. मग मी त्यांच्यात शब्दात त्यांची बोलती बंद करतो.

सध्या करणकडे 'तख्त' आणि 'दोस्ताना 2' हे सिनेमे आहेत. या सिनेमांची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करणार आहे. यापूर्वी रिलीज झालेला करण जोहरचा 'कलंक' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता.

First published: May 25, 2020, 7:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading