बापमाणूस करणनं आणलं बाळांना घरी

बापमाणूस करणनं आणलं बाळांना घरी

करण जोहरनं आपल्या दोन्ही बाळांना-रूही आणि यशला- आपल्या घरी आणलंय. गेल्या महिन्यात करण बाबा बनला. पण प्री-मॅच्युअर डिलिवरीमुळे बाळांना हाॅस्पिटलमध्येच ठेवावं लागलं होतं.

  • Share this:

30 मार्च : करण जोहरनं आपल्या दोन्ही बाळांना-रूही आणि यशला- आपल्या घरी आणलंय. गेल्या महिन्यात करण बाबा बनला. पण प्री-मॅच्युअर डिलिवरीमुळे बाळांना हाॅस्पिटलमध्येच ठेवावं लागलं होतं. करणनं मुलांना उचलून घेतलेला फोटो वायरल झालाय. पण त्यात तो पाठमोरा दिसतोय.

करणची ही मुलं 10 आठवडे अगोदर जन्मली. पण आता दोघंही व्यवस्थित आहे.

करण म्हणतो,'मुलांची वजनं कमी होती,म्हणून खूप टेंशन होतं. तेव्हाच वाटायचं, मुलांना जवळ घ्यावं. पण परवानगी नव्हती हात लावायची. पण आता सगळं ठीक आहे.'

करण जोहर दोघांचीही खूप काळजी घेतोय. 'बापमाणूस' झाल्यावर करण जोहरवर नवी जबाबदारी आलीय.

First published: March 30, 2017, 2:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading