अखेर करण जोहरने सांगितलं त्या Drugs Party चं सत्य

अखेर करण जोहरने सांगितलं त्या Drugs Party चं सत्य

पार्टीत अमली पदार्थ घेण्याचा आरोप करण जोहरवर (Karan Johar) करण्यात आला होता. या प्रकरणी आता त्याने स्वतःची बाजू मांडली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट- पार्टीत अमली पदार्थ घेण्याचा आरोप करण जोहरवर (Karan Johar) करण्यात आला होता. या प्रकरणी आता त्याने स्वतःची बाजू मांडली आहे. राजीव मसंदशी बोलताना त्याने पार्टीतील त्या व्हिडीओचा उल्लेख केला होता. करण म्हणाला की, जर त्या पार्टीत अमली पदार्थ वापरले असते तर आम्ही तो व्हिडीओ काढला असता का? करण पुढे म्हणाला की, 'पार्टीत सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार होते. आठवड्याभराच्या कामानंतर ते एन्जॉय करत होते. मी स्वतः तो व्हिडीओ शूट केला. जर त्यात काही चुकीचं होत असतं तर मी तो व्हिडीओ शेअर केला असता का?'

करण पुढे म्हणाला की, विकी कौशलच्या शेजारी असलेल्या लाइटच्या रिफ्लेक्शनला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं.. तुम्हाला व्हिडीओ शूट करताना नाक खाजवायची संमती नाही.. एवढंच काय तर तुम्ही तुमचा फोनही खिशात ठेवू शकत नाही. लाइटच्या रिफ्लेक्शनला पावडर समजलं जातं.

तेव्हा विकीला डेंग्यू झाला होता आणि तो त्यातून बरा होत होता. तो फक्त लिंबू पाणी पीत होता. ती सर्व मित्रांची पार्टी होती. हा व्हिडीओ शूट करण्याच्या पाच मिनिटांपूर्वींपर्यंत माझी आई त्याच रूममध्ये आमच्यासोबत बसली होती. तो एक प्रकारचा कौटुंबिक कार्यक्रमच होता.

त्या पार्टीवरून त्याच्यावर जे आरोप होत होते त्यावर काहीही न बोलण्याचा करणने निर्णय घेतला होता. त्याच्या मते, निरर्थक आरोपांना तो उत्तरं देत नाही. करण पुढे म्हणाला की, जर असं पुन्हा झालं तर याविरोधात तो कायदेशीर कारवाई करेल.

...अखेर त्या अफेअरबद्दल बोलला केएल राहुल

इंटरनेटवर लीक झालेत या अभिनेत्याचे सेक्स सीन

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 11:44 AM IST

ताज्या बातम्या