Home /News /entertainment /

Karan Johar चा मुलगा बनला शेफ! बनवली 'ही' डिश, VIDEO झाला VIRAL

Karan Johar चा मुलगा बनला शेफ! बनवली 'ही' डिश, VIDEO झाला VIRAL

करण जोहरने (Karan Johar) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. करण जोहरने त्याचा मुलगा यश स्नॅक (Yash Johar) बनवतानाचा एक नवीन व्हिडिओ शेअर (Share Video) केला आहे. व्हिडिओमध्ये यश कोणासोबत व्हिडिओ कॉल करताना दिसत आहे.

  मुंबई,2 डिसेंबर-   करण जोहरने   (Karan Johar)   इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. करण जोहरने त्याचा मुलगा यश स्नॅक (Yash Johar)   बनवतानाचा एक नवीन व्हिडिओ शेअर   (Share Video)  केला आहे. व्हिडिओमध्ये यश कोणासोबत व्हिडिओ कॉल करताना दिसत आहे. बहुधा तो त्याचे स्वयंपाक कौशल्य त्याच्या शिक्षकांना आणि वर्गमित्रांना दाखवत असेल. या व्हिडिओमध्ये, करणचा मुलगा यश स्वयंपाकघरात शेफचा कोट आणि टोपी घातलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो ब्रेड स्लाइसवर बटरचा जाड थर लावून काकडी आणि टोमॅटो सँडविच तयार करत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Karan Johar (@karanjohar)

  व्हिडिओ कॉलमध्ये यशच्या एका वर्गमित्राचा आवाज ऐकू येत असल्याचे दिसत आहे. तो यशला प्लेट कॅमेऱ्याच्या जवळ आणण्यास सांगतो जेणेकरून सर्वांना चांगले पाहता येईल. यशच्या मागच्या बाजूला त्याच्या घरचा शेफही दिसत आहे. यशने कोटाखाली निळ्या रंगाची शॉर्ट्स आणि शूज घातले आहेत. सँडविच बनवताना तो खूपच उत्साही दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना करण जोहरने लिहिले की, "आमच्या घरात एक शेफ आहे! शेफ यश जोहर!" करणच्या चाहत्यांना त्याच्या मुलाची ही छोटीशी झलक खूप आवडली आणि इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रांनी या व्हिडिओला क्यूट म्हटले आहे. अभिनेत्री सोफी चौधरीने लिहिले की, "मी इतका सुंदर शेफ कधीच पाहिला नाही." मनीष मल्होत्रा ​​यांनी लिहिले, "त्याच्याकडे पहा." संजय कपूरची पत्नी महीप कपूरनेखास इमोजी शेअर केले आहेत. (हे वाचा:कार्तिक आर्यनचं कोणासोबत सुरू आहे लपंडाव? अभिनेत्याने केला मोठा खुलासा ) यापूर्वी करण जोहर त्याचा मुलगा यश आणि मुलगी रुही यांचे व्हिडिओ जवळजवळ दररोज शेअर करत असे, परंतु गेल्या वर्षी जूनपासून त्यांनी त्यांचे व्हिडिओ शेअर करणे बंद केले. गेल्या वर्षी जूनमध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते, त्यानंतर त्याने सोशल मीडियापासून बराच ब्रेक घेतला होता.. रुही आणि यश यांचा जन्म 2017 मध्ये सरोगेटद्वारे झाला होता. रुहीचे नाव करणची आई हिरू जोहर यांचे नाव आहे, तर यशचे नाव त्याचे वडील दिवंगत चित्रपट निर्माते यश जोहर यांच्या नावावर आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Karan Johar

  पुढील बातम्या