गे म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला करण जोहर, अशी केली बोलती बंद

करणनं निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रचंड यशही मिळवलं. मात्र अनेकदा त्याला त्याच्या लैंगिकतेवरून ट्रोल व्हावं लागतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 10:34 AM IST

गे म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला करण जोहर, अशी केली बोलती बंद

मुंबई, 19 ऑगस्ट : निर्माता करण जोहर सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती मानली जाते. अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात करणाऱ्या करणनं नंतर निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत त्यात प्रचंड यशही मिळवलं. तसेच अनेक नव्या कलाकारांना ही त्यानं लॉन्च सुद्धा केलं. मात्र अनेकदा त्याला त्याच्या लैंगिकतेवरून ट्रोल व्हावं लागतं. अनेकदा करण या सर्व गोष्टीवर दुर्लक्ष करताना दिसतो. पण नुकतंच एका युजरनं अशाप्रकारे त्याला ट्रोल करायचा प्रयत्न केला त्यावर मात्र करणनं त्याला सडेतोड उत्तर दिलं. ज्यामुळे त्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

करणला एका युजरनं ट्विटर एक पोस्ट करत ट्रोल करायचा प्रयत्न केला. त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, करण तुझ्यावर एक सिनेमा तयार करायला हवा, 'करण जोहर : द गे' हे ट्वीट पाहिल्यावर करण जोहर भडकला पण तरीही त्यानं संयम राखत या युजरला उपरोधिक शब्दात सडेतोड उत्तर दिलं. करणनं त्याच्या ट्वीटला रिप्लाय देताना लिहिलं, 'तू खरंच जिनिअस आहेस. या विषयी ट्विटरवरून आवाज उठवल्याबद्दल तुझे आभार' करणच्या या ट्वीटनंतर इतर अनेक ट्वीटर युजर्सनी त्याला पाठिंबा दिला.

कपड्यांमुळे प्रियांका पुन्हा चर्चेत, दिराच्या पार्टीत घातला ट्रान्सपरंट ड्रेस

करणला ट्रोल करण्याचा या युजरचा प्लान पुरता फसलेला दिसून आला कारण त्याच्या या ट्वीटला करणनं उत्तर दिल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्या युजरलाच ट्रोल करायला सुरुवात केली आणि करण जोहर मात्र अशा फालतू लोकांकडे तू लक्ष देऊ नकोस असा सल्ला सुद्धा दिला.  एका युजरनं लिहिलं, चाहत्यांनी सध्या शिस्त शिकण्याची गरज आहे. करण तू अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. काही दिवसांपूर्वी अरबाज खानच्या पिंच बाय अरबाज खान या चॅट शोमध्ये करणनं तो त्याच्या ट्रोलर्सना कसं सामोरं जातो हे सांगितलं होतं.

Loading...

Zomato सिंगरचा व्हिडिओ व्हायरल; डिलिव्हरी बॉय झाला देशभरात फेमस!

अरबाज खानच्या चॅट शोमध्ये करणला त्याच्या ट्रोलर्स विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना करण म्हणला, मी जेव्हा अशा नकारात्मक कमेंट वाचतो त्यावेळी मला खूप दुःख होतं. राग येतो. जेव्हा मी सकाळी उठतो आणि पाहतो तर लोक मला सोशल मीडियावर शिव्या देत असातात. जसं की मी काही चुकीचं केलं आहे. ते माझ्याशी बोलू शकतात मात्र त्यांनी अशा कमेंट करायला नको जर मी एखाद्या आजारानं पीडीत आहे. मग मी त्यांच्यात शब्दात त्यांची बोलती बंद करतो.

Mission Mangal च्या अभिनेत्रींमध्ये झाली जबरदस्त कॅटफाइट? विद्यानं सांगितलं...

 

View this post on Instagram

 

Davos nights! In @givenchyofficial styled by @nikitajaisinghani

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

सध्या करणकडे 'तख्त' आणि 'दोस्ताना 2' हे सिनेमे आहेत. या सिनेमांची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करणार आहे. यापूर्वी रिलीज झालेला करण जोहरचा 'कलंक' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता.

=============================================================================

Zomato महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ केल्याचा VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2019 10:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...