'सैराट'ची अखेर बाॅलिवूडमध्ये 'धडक', पोस्टर रिलीज

'सैराट'ची अखेर बाॅलिवूडमध्ये 'धडक', पोस्टर रिलीज

आर्चीच्या भूमिकेत श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर आणि परशाच्या भूमिकेत शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर या सिनेमात झळकणार आहे.

  • Share this:

15 नोव्हेंबर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हिंदी 'सैराट' सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती आणि आता अखेर या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. करण जोहरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या सिनेमाचा पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे.

या सिनेमाचं नाव 'धडक' असं ठेवण्यात आलं आहे. आर्चीच्या भूमिकेत श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर आणि परशाच्या भूमिकेत शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर या सिनेमात झळकणार आहे.

आपल्या सगळ्यांची धकधक वाढवणारा हा सिनेमा 6 जुलै 2018ला आपल्या भेटीला येणार आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी 'सैराट' सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक विक्रम बनवला आहे. सैराटच्या या यशाने फक्त मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही भुरळ घातली. त्यामुळेच बॉलिवूडचा प्रख्यात दिग्दर्शक करण जोहरने हिंदी सैराटचे हक्क विकत घेतले आणि या सिनेमाचं शुटिंग सुरु झालं.

शशांक खेतान 'धडक' या सिनेमाचं दिग्दर्शिन करणार आहे. 'झी स्टुडिओ आणि धर्मा प्रोडक्शन' निर्मित हा सिनेमा प्रेक्षकांवर काय जादू करतो हे पाहणं आता महत्वाचं आहे.    

 

First published: November 15, 2017, 7:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading