'कुछ कुछ होता है'च्या सिक्वलबद्दल करण जोहरनं केला महत्त्वाचा खुलासा

'कुछ कुछ होता है'च्या सिक्वलबद्दल करण जोहरनं केला महत्त्वाचा खुलासा

करण जोहरच्या कुछ कुछ होता है सिनेमाला 20 वर्ष झाली.

  • Share this:

मुंबई, 9 नोव्हेंबर : करण जोहरच्या कुछ कुछ होता है सिनेमाला 20 वर्ष झाली. त्यानिमित्तानं एक मोठा कार्यक्रमही ठेवला होता. काजोल, शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार का, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण यावर आता खुद्द दिग्दर्शकानंच तोंड उघडलंय.


करण जोहरनं एका ट्विटला उत्तर दिलंय. त्याचं उत्तर ऐकून रसिकांना नक्कीच वाईट वाटेल. कारण करण जोहर सिक्वल बनवणार नाहीय. त्याचा तसा काहीच इरादा नाही.


16 आॅक्टोबर 1998 हा एक ऐतिहासिक दिवस होता. त्यादिवशी करण जोहरचा कुछ कुछ होता है रिलीज झाला. त्याला आता 20 वर्ष झाली. त्यानिमित्तानं करण जोहरनं एका इव्हेंटचं आयोजन केलं होतं.


 20 वर्षांपूर्वी तुम नही समझोगे राहुल हा डायलाॅग लोकप्रिय झाला होता. बाॅक्स आॅफिसवर या सिनेमानं हंगामाच केला होता. त्यावेळी सिनेमाला 8 फिल्म फेअर अॅवार्डस मिळाली होती. अंजली, टीना आणि राहुल खूपच हिट झाले होते. यावेळी करणनं काही किस्सेही शेअर केले. त्याच वर्षी सलमान-काजोलचा प्यार किया तो डरना क्या सिनेमा रिलीज झाला होता. म्हणजे किंग खाननं सलमानची वधू पळवून नेली, असंही करण म्हणाला.


त्यावेळीच फ्रेंडशिप बँड आला होता. टीना-राहुलचा लूक लोकप्रिय झालेला.


मध्यंतरी, 'काॅलिंग करण 2' या शोमध्ये करण जोहरला एका श्रोत्यानं प्रश्न विचारला. 'कुछ कुछ होता है 2'चा सीक्वल निघाला तर कोणाला घ्याल? करणनं लगेचंच उत्तर दिलं, सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर यांना घेईन. या तिघांचा ट्रँगल पाहायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.आलिया आणि जान्हवीला करण जोहरनंच लाँच केलं. आलिया ' स्टुडंट आॅफ द इयर'मधून तर जान्हवी 'धडक'मधून पुढे आली होती. रणबीरबरोबर करणनं 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'ये जवानी है दिवानी' सिनेमे केले होते.


Photos : रणबीर-आलिया एवढे कशामुळे दमलेत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2018 04:09 PM IST

ताज्या बातम्या