मुंबई, 29 ऑक्टोबर: करण जोहर (Karan Johar) आणि धर्मा प्रॉडक्शन (Dharma Production)च्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट काही संपायचं नाव घेत नाही. करण जोहरवर आधी नेपॉटिझमवरुन हल्लाबोल झाला. मग ड्रग अँगलमध्ये धर्मा प्रोडेक्शनचं नाव कर्मचाऱ्याचं नाव समोर आलं. आणि आता धर्मा प्रोडक्शनला लवकरच गोव्याच्या कचरा व्यवस्थापन कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. गोव्यात एका ठिकाणी धर्मा प्रॉडक्शनच्या नव्या सिनेमाचं शूटिंग चालू होतं. शूट संपल्यानंतर त्याच ठिकाणी चमचे, प्लास्टिक आणि इतर कचरा फेकून देण्यात आला होता. तो कचरा धर्मा प्रॉडक्शनच्या टीमकडून स्वच्छ करणं अपेक्षित होतं. पण नियमांचं पालन करता त्यांनी कचरा तिथेच टाकून दिला होता.
धर्मा प्रॉडक्शनला याप्रकरणी लवकरच नोटीस बजावण्यात येणार असल्याची शक्यता आहे. गोव्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी तसा सज्जड दमच करण जोहलाच्या टीमला भरला आहे. “गोव्यात प्रत्येकाचं स्वागत आहे. इथे खुशाल शूट करा पण शूटिंग झाल्यानंतर तुम्ही केलेला कचरा तिथेच टाकू नका”
Dharma Productions will get a notice for a fine from the Goa Waste Management office. Goa is a beautiful state & people come here for shooting films. Everyone is welcome to come & shoot but take your trash away & don't leave it here: Michael Lobo, Goa Waste Management Minister pic.twitter.com/78y7By7cqc
कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी धर्मा प्रॉडक्शनच्या या गलथान कारभाराचा व्हिडीओ शेअर केला होता. याप्रकरणी गोव्याचे कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी लक्ष घालत कारवाईचे आदेश दिले आहेत. तसंच धर्मा प्रॉडक्शनने झालेल्या प्रकाराची माफी मागावी असंही त्यांनी सुचवलं आहे. आता याबाबत करण जोहर नक्की काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.