VIDEO : खासगीतले क्षण शूट करत होता करण जोहर; विकी कौशलने जोडले हात म्हणाला...

VIDEO : खासगीतले क्षण शूट करत होता करण जोहर; विकी कौशलने जोडले हात म्हणाला...

करण जोहरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात विकी कौशल त्याला हा व्हिडीओ नको शूट करु अशी विनंती करताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : बॉलिवूडचा निर्माता करण जोहर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतो. अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्याचे व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात. आताही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात विकी कौशल त्याला हा व्हिडीओ नको शूट करु अशी विनंती करताना दिसत आहे.

करण जोहरचा हा व्हिडीओ व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका प्रायव्हेट प्लेनमध्ये शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये करण जोहर सुरुवातीला अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपच्या ड्रेसची स्तुती करताना दिसत आहे. त्यानंतर तो रणवीर सिंह, वरुण धवन, आयुष्मान खुराना, कार्तिक आर्यन यांच्याकडे जात त्याच्या कपड्यांची स्तुती करतो. पण जेव्हा तो असं करत करत विकी कौशलकडे पोहोचतो तेव्हा त्यानं दिलेली प्रतिक्रिया मात्र पाहण्यासारखी होती.

Video Viral झाल्यानंतर नेहाशी लग्न करण्याबाबत आदित्य नारायणचा धक्कादायक खुलासा

 

View this post on Instagram

 

the controversial video man #vickykaushal 🙊🙉🙈

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

करण जोहर व्हिडीओ शूट करत विकी कौशलकडे पोहोचतो. तेव्हा विकी कौशल तोंड फिरवलं आणि जेव्हा करणनं त्याची मस्करी करत म्हटलं, ‘द कॉन्ट्रोव्हर्सियल व्हिडीओ मॅन’. यावर विकी त्याला म्हणतो, करण प्लिज व्हिडीओ नको शूट करू. मी तुला विनंती करतो. विकीच्या या बोलण्यावर सर्वांना हसू आवरणं कठीण होतं.

'अभिनेत्री होण्यासाठी कोणासोबत अय्याशी केली नाही', तनुश्री दत्ता पुन्हा भडकली

याआधीही करण जोहरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामुळे बराच वादही निर्माण झाला होता. या व्हिडीओमधील सर्व कलाकार नशेत असल्याचं बोललं गेलं होतं. अकाली दलाचे नेता मनजिंदर सिंह सिरसा यांनी या सर्वच बॉलिवूड कलाकारांवर सडकून टीकाही केली होती. मात्र त्याच सर्वाधिक टीका विकी कौशलवर झाली होती.

मलायकाच्या बॉयफ्रेंडबद्दल मुलगा अरहानला काय वाटतं? अभिनेत्रीनं केला खुलासा

First published: February 15, 2020, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading