S M L

करण जोहरनं रणवीर-दीपिकाच्या लग्नाबद्दल नक्की काय सांगितलं?

अगदी काहींनी 20 नोव्हेंबरला या दोघांचं लग्न होणार असंही जाहीर केलं. पण नक्की काय हे कळत नव्हतं. आणि ते गुपित उलगडलं दिग्दर्शक करण जोहरनं.

Updated On: Sep 13, 2018 07:35 AM IST

करण जोहरनं रणवीर-दीपिकाच्या लग्नाबद्दल नक्की काय सांगितलं?

मुंबई, 13 सप्टेंबर : बाॅलिवूडचं हाॅट कपल रणबीर कपूर आणि दीपिका. या दोघांच्या लग्नाची चर्चा सगळीकडेच आहे. पण दोघं काही स्पष्ट बोलत नाहीत. अगदी काहींनी 20 नोव्हेंबरला या दोघांचं लग्न होणार असंही जाहीर केलं. पण नक्की काय हे कळत नव्हतं. आणि ते गुपित उलगडलं दिग्दर्शक करण जोहरनं.

करण जोहरचा कॉलिंग करण हा शो सध्या खूप लोकप्रिय झालाय. सर्वसामान्य करणला याबद्दल विचारत असतात. तसाच एक प्रश्न विचारला गेला तो दीपिका-रणवीर सिंगबद्दल. दीपिका-रणवीर लग्न करणार की नाही? असा थेटच प्रश्न विचारला. तेव्हा करणनं उत्तर दिलं, 'मी हे नाकारत नाही.' झालंच की सगळं क्लियर.

असं म्हणतात, हे शाही लग्न इटलीला आहे. लेक कोमा शहरात हे लग्न आहे. दीपिकाच्या आईनं लग्नाआधी बेंगलुरूच्या एका मंदिरात एक पूजा ठेवलीय. त्यासाठी रणवीरच्या घरच्यांना बोलावलंय.रणवीर- दीपिकाच्या या ग्रॅण्ड वेडिंगची तयारी सुरु झाली आहे. या लग्नात फक्त जवळच्या ३० जणांना आमंत्रण देण्यात येणार आहे.

डीएनए वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रणवीर- दीपिकाच्या लग्नात पाहुण्यांना मोबाईल, कॅमेरा आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सोनम आणि अनुष्काच्या लग्नामधून धडा घेत दीपिकाने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

दीपिकाला तिच्या लग्नाचे कुठलेच खासगी फोटो लगेच सोशल मीडियावर व्हायरल होऊ द्यायचे नाहीयेत. रणवीर- दीपिकाला त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे शाही फोटो सर्वांसोबत शेअर करायचे आहेत. त्यामळे दीपिकाचा हा निर्णय कितपत यशस्वी होतोय ते आता वेळ आल्यावरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2018 07:35 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close