करण जोहरनं आणलं आमिर,शाहरुख,रणबीर,रणवीर यांना एकत्र

करण जोहरनं आणलं आमिर,शाहरुख,रणबीर,रणवीर यांना एकत्र

करण जोहर बाॅलिवूडमध्ये सगळ्यांचाच मित्र आहे. त्यामुळे एरवी एकमेकांचे व्यावसायिक स्पर्धक त्याच्या घरी एकत्र आलेले दिसतात.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : करण जोहर बाॅलिवूडमध्ये सगळ्यांचाच मित्र आहे. त्यामुळे एरवी एकमेकांचे व्यावसायिक स्पर्धक त्याच्या घरी एकत्र आलेले दिसतात. नुकताच करणनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय. खऱ्या अर्थानं तो ब्लाॅकबस्टरच आहे.

शाहरूख खान, आमिर खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, आलिया भट आणि करण जोहर या सर्वांचा अत्यंत लोभसवाणा फोटो करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केलाय. 'बिगेस्ट blockbuster ever' असं शीर्षकही त्यानं दिलंय. पण हे कोणत्या सिनेमासाठी नाही तर फक्त एक गेटटूगेदर म्हणून भेटले होते. पण बॉलिवूडप्रेमींनी हा 'फोटो of the year'  म्हणून व्हायरल  करायला सुरुवात केलीय. आतापर्यंत 4 लाखांपेक्षा अधिक लाईक्सदेखील मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

The biggest BLOCKBUSTER ever!!!!!❤️😘😘😘😘

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

करण जोहर अख्ख्या बाॅलिवूडचा मित्र आहे. अनेक जण त्याचा सल्ला घेतात. स्वत: अविवाहित असलेला करण जोहर सगळ्यांना सुखी रिलेशनशिपचे, सुखी लग्नाचे सल्ले देतोय. करणचा रेडिओ शो काॅलिंग सध्या चर्चेत आहे. या शोद्वारे तो सगळ्यांशी संवाद साधतोय. आणि असाच एक खाजगी सल्ला करणनं रणबीर कपूरला दिलाय.

रणबीरनं या शोमध्ये करणला विचारलं, 'जर तुम्ही तुमच्या पहिल्या रिलेशनशिपमध्ये एक चूक करता आणि तीच चूक पुन्हा तुम्ही दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये देखील करता तर ती सुधारण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे ?'

यावर करणनं ताबडतोब उत्तर दिलं, 'तुम्ही त्या नात्यातून लगेच बाहेर पडायला पाहिजे. तुम्ही एकच चूक नेहमी करत असाल, तर तुमच्यात काही कमतरता आहे. तेव्हा वेळीच सावध व्हायला हवं.'

त्यानंतर रणबीरनं विचारलं, ' तू माझ्या गर्लफ्रेंडला काय सल्ला देशील?' यावर करण म्हणाला, 'तू जगातला सर्वात बेस्ट नवरा आहेस. आणि हा सल्ला मी तुझ्या गर्लफ्रेंडला कधीच दिलाय.'

Success Story : नालेसफाई करत थेट गाठली केबीसीची हॉट सीट आणि जिंकले...!

First published: September 27, 2018, 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading