मुंबई, 15 डिसेंबर - फिल्म मेकर्स करण जोहर याने आयोजित केलेल्या बॉलिवूड सुपर स्टारच्या सुपर स्प्रेडर पार्टीत अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt )देखील होती. याच पार्टीतील 4 अभिनेत्रींना कोविड 19 संसर्गाची बाधा झाली होती. याच पार्टीत उपस्थित असलेली आलिया भट्ट हीची कोविड 19 संसर्ग चाचणी निगेटीव्ह आली असली तरी तिला मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन रहाण्याचा बंधन घातलं होतं.
आलियाची कोविड 19 संसर्ग चाचणी निगेटीव्ह आली असली तरी ती एका हाय रिस्क कोविड 19संसर्ग बाधीत रुग्णाच्या संपर्कात आली असल्यामुळे तिला होम क्वारंटाईन रहाण्याचं बंधन बीएमसीने दिलं होतं. मात्र तरी ही आलिया भट्ट बीएमसीच्या नियमांचे उल्लंघन करत शुटींगसाठी दिल्लीला मुंबईहून चार्टट प्लेनने गेली. त्यामुळे बीएमसीच्या आरोग्य विभागाने दिल्लीच्या आरोग्य विभागाला आलिया भट्टची माहिती दिली. त्यानंतर दिल्ली आरोग्य विभागाने आलिया भट्टशी संपर्क साधण्याचा प्रयत्नं केला. मात्र आलिया भट्ट कोणाशीही संपर्क साधत नसल्याची माहीती मिळतेय.
View this post on Instagram
करण जोहरच्या पार्टीत करीना कपूर, अमृता अरोरा, सोहेल खानची पत्नी सीमा खान, संजय कपूरची पत्नी महिप कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्टीत आलिया देखील होती. तिची चाचणी जरी निगेटीव्ह आली असली तरी तिला क्वारंटाईन रहाण्याचं बंधन होतं. मात्र तिनं तसं न करता दिल्ली गाठल्याची माहिती समोर आली आहे.
आज बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने दिल्लीतील प्रसिद्ध बंगला साहेब गुरुद्वारामध्ये दर्शन घेतल्याचे देखील काही फोटो समोर आले आहेत.आलिया भट्ट आपला खास मित्र आणि दिग्दर्शक आयान मुखर्जीसोबत याठिकाणी पोहोचली होती.आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आयान मुखर्जीच्या बहुप्रतीक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात झळकणार आहेत.या चित्रपटाचा आज मोशन पोस्टर रिलीज केला जाणार आहे. तत्पूर्वीच चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेत्रीने गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलं आहे. त्यानंतर ही बातमी समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Karan Johar