मुंबई, 24 जून : मंगेशकर कुटुंबीय निर्माता करण जोहरवर प्रचंड नाराज झालेत. त्यांनी आपली ही नाराजी उघडपणे त्याच्या कानावर घातलीये. झालंय असं की करणच्या 'लस्ट स्टोरिज' या सिनेमात कियारा अडवाणीवर एक दृष्य चित्रीत करण्यात आलंय. या दृष्यात कियारा हस्तमैथुन करत असताना दाखवण्यात आलंय. मात्र बॅकग्राऊंडला कभी खुशी कभी गम हे गाणं चालू आहे.
हे गाणं लतादीदींनी गायलं असून एवढ्या अश्लिल दृष्यात ते वापरल्यामुळे आपला अवमान झाला, असं दीदींना वाटलं. त्यामुळे हे गाणं या दृष्यातून त्वरित काढून टाकावं अशी मागणी मंगेशकर कुटुंबीयांनी केलीय.
लस्ट स्टोरिज हा नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय. यात प्रेमाच्या, वासनेच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राधिका आपटेनंही यात भूमिका साकारलीय.