मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Karan Johar चा सीक्रेट WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी उतावीळ आहेत रणबीर-आलिया, होतात अशाप्रकारच्या गप्पा

Karan Johar चा सीक्रेट WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी उतावीळ आहेत रणबीर-आलिया, होतात अशाप्रकारच्या गप्पा

आलिया भट्ट आणि करण जोहर (Alia Bhatt and Karan Johar) एकमेकांना फॅमिलीच मानतात, ती देखील या सीक्रेट ग्रुपमध्ये नाही आहे. त्यामुळे आलिया आणि रणबीर या दोघांनाही या ग्रुपचा भाग व्हायची इच्छा आहे. पण करणने अजून त्यांना या ग्रुपमध्ये घेतलं नाही आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 22 एप्रिल: निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar Latest News) हे नाव भारतातील प्रत्येक सिनेरसिकाला माहित आहे. बॉलिवूडमध्ये (Karan Johar Movies) करण जोहरला विशेष असे स्थान आहे. तो सर्वोत्कृष्ट फिल्म निर्मात्यांपैकी एक आहे. करण जोहरच्या सिनेमात एकदा तरी काम करता यावे असे प्रत्येक कलाकाराला वाटते. मात्र करण जोहरच्या या सिक्रेट WhatsApp ग्रुपचा (Karan Johar Secret WhatsApp Group) भाग होता यावं असंही अनेक सुपरस्टार्सना वाटते आहे. याबाबत स्वत: खुलासा करण जोहर याने केला आहे. आलिया भट्ट आणि करण जोहर (Alia Bhatt and Karan Johar) एकमेकांना फॅमिलीच मानतात, ती देखील या ग्रुपमध्ये नाही आहे. त्यामुळे आलिया आणि रणबीर या दोघांनाही या ग्रुपचा भाग व्हायची इच्छा आहे. पण करणने अजून त्यांना या ग्रुपमध्ये घेतलं नाही आहे.

नेमका काय आणि कुणाचा आहे हा ग्रुप?

जेनिस सिकेराच्या 'सोशल मीडिया स्टार विद जेनिस' या युट्युबवरील मुलाखतीमध्ये करण जोहरने या WhatsApp Group बाबत माहिती दिली. त्याने असे म्हटले की, 'A लिस्ट नावाचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे, आणि प्रत्येक जण A अक्षर असणारा आहे. अमृता आहे जी प्रोडक्शन डिझायनर आहे, अयान मुखर्जी आहे. हा असा ग्रुप आणि ज्याठिकाणी ट्रेलर्सचे विश्लेषण केले जाते. अभिषेक वर्मन जे '2 स्टेट्स' चे दिग्दर्शक आहे, जे नेहमी नवीन सिनेमांचे ट्रेलर पोस्ट करतात, नंतर आम्ही सगळे त्यावर आमचं मत मांडतो.' करणने पुढे असं म्हटलं की या ग्रुपमधील कोणताही मेसेज फॉरवर्ड केला जात नाही.

हे वाचा-Malti Marie Chopra Jonas: 'नावात पिनकोड पण जोडा...', प्रियांकाच्या लेकीच लांबलचक नावामुळे मीम्सचा पाऊस

करण जोहरने पुढे असं म्हटलं की 'या ग्रुपमध्ये आलिया आणि रणबीर यांनी सहभागी होण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही त्यांना स्विकारलं नाही. अयानने असं म्हटलं की या ग्रुपमध्ये कुणी सुपरस्टार असणार नाही कारण असं होऊ शकतं की आम्ही त्याच्या चित्रपटावर मत मांडू, मात्र आमचे रिव्ह्यू फार गमतीदार असतात.' ज्या अयान मुखर्जीने कोणत्याही सुपरस्टारला या ग्रुपमध्ये घेण्यास नकार दिला तो रणबीर आणि आलियाचा खूप जवळचा मित्र आहे. याच दिग्दर्शकाच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात आलिया-रणबीर एकत्र दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

बॉलिवूडमधील हे 'ड्रीम वेडिंग' अलीकडेच पार पडलं आहे. जवळपास 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 14 एप्रिल 2022 रोजी अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Alia Bhatt and Ranbir Kapoor Wedding) यांचं लग्न झालं. लग्नाचे सर्व विधी पार पाडल्यानंतर हे दोन्ही कलाकार कामावरही परतले आहेत. अभिनेता रणबीर कपूर टी सीरिजच्या ऑफिसबाहेर दिसला होता. त्यानंतर आता आलिया भट्ट देखील लग्नाच्या पाचच दिवसांनी जैसलमेरला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी रवाना झाली आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Karan Johar, Ranbir kapoor