मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सिद्धार्थच्या जाण्याने भावुक झाला करण जोहर; पाहा अभिनेत्याविषयी काय म्हणाला

सिद्धार्थच्या जाण्याने भावुक झाला करण जोहर; पाहा अभिनेत्याविषयी काय म्हणाला

बिग बॉस ओटीटीचा होस्ट आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरही (Karan Johar) आता त्याच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई 6 सप्टेंबर : प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) विजेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) 2 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं. या बातमीनंतर त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 3 सप्टेंबर रोजी मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार झाले आणि सिद्धार्थने शोकाकूल वातवरणात शेवटचा निरोप घेतला. अनेक टीव्ही स्टार्स त्याला निरोप देण्यासाठी स्मशानभूमीवर पोहोचले होते. सिद्धार्थच्या कुटुंबियांसह, निकटवर्तीय मित्र मैत्रिणी आणि चाहते सर्वांनाच सिद्धार्थचं जाणं पचवणं कठीण झालं आहे. बिग बॉस ओटीटीचा होस्ट आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरही (Karan Johar) आता त्याच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बिग बॉस ओटीटीच्या (Bigg Boss OTT) संडे का वॉर एपिसोडमध्ये सुरूवातीलाच करणने सिद्धार्थच्या आठवणींनी एपिसोडची सुरूवात केली . करणने सिद्धार्थच्या चांगल्या गोष्टींना उजाळा दिला. तर त्याच्या न होण्याची कमी राहील असंही म्हटलं. त्याचं हास्य खूप सुंदर होतं. आणि तो एक खरी व्यक्ती होता. याशिवाय सिद्धार्थचे काही व्हिडोस दाखवण्यात आले. जेव्हा तो बिग बॉसमध्ये होता.

View this post on Instagram

A post shared by Voot Select (@vootselect)

करण सिद्धार्थला ओळखत होता. कारण त्याने हम्प्टी शर्मा की दुल्हनिया चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याशिवाय करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरही सिद्धार्थची स्टोरी शेअर केली होती. करणशिवाय सगळ्यांनाच सिद्धाच्या अकाली एक्झीटने मोठा धक्का बसला आहे. तर त्याचं जाणं चाहत्यांनाही पचवणं कठीण झालं आहे.

सिद्धार्थने वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील कूपर रुग्णालयात (cooper hospital) त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. त्याला हृद्यविकाराचा झटका आला होता असं कूपर रुग्णालयातील डॉक्टर्सनी सांगितलं होतं.

First published: