'कलंक'चं 'तबाह हो गए' गाणं रिलीज, पण चाहते मात्र नाराज

'कलंक'चं 'तबाह हो गए' गाणं रिलीज, पण चाहते मात्र नाराज

प्रेक्षकांना माधुरीचा डान्स तर आवडला असला तरीही गाण्याच्या लिरिक्स आणि म्यूझिक मात्र त्यांच्या पसंतीत उतरलेलं नाही.

  • Share this:

मुंबई, 09 एप्रिल : करण जोहरचा बहुचर्चित सिनेमा कलंक, 17 एप्रिलला रिलीज होत आहे. नुकतंच या सिनेमातील 'तबाह हो गए' हे गाणं रिलीज झालं. निर्माता करण जोहरनं ट्विटरवरुन यांची माहिती दिली. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रीत झालेलं हे गाणं गायिका श्रेया घोषालनं गायलं आहे. या गाण्याची गीतरचना अमिताभ भट्टचार्य यांनी केली असून सरोज खान आणि रेमो डिसोझा यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

माधुरी दीक्षितवर चित्रीत झालेल्या या गाण्याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पण गाण्याच्या रिलीजनंतर चाहत्यांचा प्रतिक्रिया पाहिल्यावर मात्र या गाण्यानं प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरल्याचं दिसून आलं. सोशल मीडियावर हे गाणं व्हायरल होत असलं तरीही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मात्र खूप वेगवेगळ्या आहेत. प्रेक्षकांना माधुरीचा डान्स तर आवडला पण या गाण्याच्या लिरिक्स आणि म्यूझिक मात्र प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलेलं नाही. त्यामुळे या गाण्यावर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. या गाण्यावर बहुतांश चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या गाण्यावर चाहत्यांचं म्हणणं आहे की हे गाणं फारसं चांगलं नाही. त्यामुळे हे असं गाणं निर्मात्यांनी माधुरी सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीला कसं काय दिलं. या गाण्यवर प्रतिक्रिया देताना एका युझरनं लिहिलं हे गाणं अजिबात चांगलं नाही. या सिनेमातील सर्वच गाणी कोणत्यातरी जुन्या ट्यूनवर आधारित असल्यासारखी वाटतात. तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं आहे, प्रत्येकजण संजय लीला भन्साळींना कॉपी करण्याचा प्रयत्न करत असला तरीही ते भन्साळी बनू शकत नाही. गाण्यातील म्यूझिक, लिरिक्स यापैकी कोणतीच गोष्ट या डान्सला मॅच करत नाही.

'तबाद हो गए' माधुरी दीक्षित क्लासिकल डान्स करताना दिसत आहे. संपूर्ण गाण्यात ती सुंदर दिसत असून या गाण्यातील तिचं गेटअपही खूपच छान आहे. माधुरी एक प्रसिद्ध डान्सर आहे तिचं नृत्याचं कसब या गाण्यात दिसतं. तिने खूप सुंदर परफॉर्म केलं आहे. 'कलंक'मध्ये माधुरी बेगम बहार ही भूमिका साकारत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक बर्मननं केलं असून करण जोहर या सिनेमाचा निर्माता आहे. या सिनेमामध्ये माधुरी दीक्षित व्यतिरिक्त वरुण धवन, आलिया भट, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

First published: April 9, 2019, 7:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading