मुंबई, 11 ऑगस्ट- बॉलिवूड(Bollywood) दिग्दर्शक करण जोहरचा(Karan Johar) चित्रपट ‘कभी अलविदा ना कहना’(Kabhi Alvida Na Kehana) आजही सर्वांना भावुक करून जातो. या चित्रपटाला आज तब्बल 15 वर्षे पूर्ण(15 Years Complete) झाली आहेत. 11 ऑगस्ट 2006 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, अभिषेक बच्चन, किरण खैर यांसारख्या तगड्या स्टारकास्टने या चित्रपटात काम केलं आहे. मात्र या चित्रपटासाठी अभिनेत्री काजोलला विचारणा करण्यात आली होती. मात्र काजोलने या चित्रपटासाठी नकार दिला होता.
View this post on Instagram
अभिनेत्री काजोल आणि दिग्दर्शक करण जोहर यांची मैत्री किती दृढ आहे हे जगजाहीर आहे. मात्र तरीसुद्धा काजोलने आपला मित्र करण जोहरला ‘कभी अलविदा ना केहना’ चित्रपटासाठी नकार दिला होता. जेव्हा करण जोहरने हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याने आपली मैत्रीण काजोलला यासाठी विचारणा केली. त्याला पूर्ण विश्वास होता, की काजोल यासाठी कधीच नकार देणार नाही. मात्र उलट झालं. काजोलने हा चित्रपट करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
(हे वाचा:Jug Jugg Jeyo: शुटींगपूर्वी वरुन धवन झाला अस्वस्थ; शेयर केले सेटवरील PHOTO)
कारण काजोलला या चित्रपटाची स्टोरी पसंत पडली नव्हती. तिला अजिबात आवडलं नव्हतं की दोन व्यक्ती लग्नानंतर एकमेकांच्या पार्टनरची फसवणूक करून अफेयर करतात. परखड मत मांडणाऱ्या काजोलने करणला स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की तिला ही स्टोरी अजिबात पसंत पडली नाहीय. एकवेळ काजोलने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी काजोलला विचारण्यात आलं की ‘ऐश्वर्या आणि अभिषेकचं नुकतचं लग्न झालं आहे. त्यांच्यासाठी काय सल्ला देशील यावर काजोलने हसतहसत म्हटलं होतं ‘कभी अलविदा ना कहना’ अजिबात बघू नका’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment