मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'दोस्ताना'च्या सिक्वलमध्ये दिसणार 'ही' नवीन जोडी

'दोस्ताना'च्या सिक्वलमध्ये दिसणार 'ही' नवीन जोडी

आता करण जोहर दोस्तानाचा सिक्वल घेऊन येतोय. आणि या सिक्वलमध्ये एका अभिनेत्रीला लाॅटरी लागलीय.

आता करण जोहर दोस्तानाचा सिक्वल घेऊन येतोय. आणि या सिक्वलमध्ये एका अभिनेत्रीला लाॅटरी लागलीय.

आता करण जोहर दोस्तानाचा सिक्वल घेऊन येतोय. आणि या सिक्वलमध्ये एका अभिनेत्रीला लाॅटरी लागलीय.

    मुंबई, 20 आॅगस्ट : तुम्हाला दोस्ताना सिनेमा आठवतोय ना? प्रियांका चोप्रा,अभिषेक बच्चन आणि जाॅन अब्राहम यांची धमाल मस्ती आपण 2008मध्ये अनुभवली होती.  आता करण जोहर दोस्तानाचा सिक्वल घेऊन येतोय. आणि या सिक्वलमध्ये एका अभिनेत्रीला लाॅटरी लागलीय. दिग्दर्शक करण जोहरने 'दोस्ताना'च्या सिक्वलसाठी प्रियांका नाही तर श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरची निवड केली आहे.जान्हवीचा धडक हिट झाल्यानंतर तिनं बाॅलिवूडमध्ये धडाकेबाज एन्ट्री केलीय. करण जोहरच्या 'तख्त'मध्ये ती आहेच. आणि आता दोस्तानाच्या सीक्वलमध्ये ती झळकणार आहे.

    या चित्रपटात जान्हवी व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्राही दिसणार आहे. चित्रपटासाठी तिसऱ्या अभिनेत्याचा शोध सध्या करण घेत आहे. करणनं काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा सिक्वल काढण्याचा मानस बोलून दाखवला होता. मात्र सिक्वलसाठी दमदार कथानक करणला मिळत नव्हतं. शेवटी ते मिळालंच. अखेर पुढील वर्षांपर्यंत हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्धार करणनं केला आहे.

    याशिवाय करण काजोल आणि शाहरूखला घेऊन सिनेमा काढतोय. काजोल, शाहरूख खान यांची जोडी मोठ्या पडद्यावर चांगलाच रंग आणते. आणि त्यांना एकत्र आणण्याचं काम करण जोहर करत असतो. त्यामुळे हे त्रिकुट एकत्र असलं तर चांगलं काही तरी पाहायला मिळणार एवढं नक्की. नुकतंच एका पार्टीत या तिघांना एकत्र पाहिलं होतं. मग चर्चेला उधाणच आलं. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच हे तिघं सिनेमा करणार आहेत.

    कळलेल्या माहितीनुसार करण जोहरनं शाहरूख-काजोलला स्क्रीप्ट ऐकवलंय. दोघंही त्यावर चर्चा करतायत. अजून सिनेमा साईन केलेला नाही. पण लवकरच प्रेक्षकांना काही तरी धमाका पाहायला मिळणार आहे, हे नक्की.

    दाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी

    First published:
    top videos

      Tags: Dostana, Janhavi kapoor, Karan Johar, Sequal