फक्त दीपिकालाच माहीत होतं करणचं 'हे' गुपित

फक्त दीपिकालाच माहीत होतं करणचं 'हे' गुपित

पहिल्याच भागात आलिया आणि दीपिका आहेत. याच भागात करणचं एक गुपित उघड होणार. हे फक्त दीपिकालाच माहीत होतं.

  • Share this:

मुंबई, 21 आॅक्टोबर : करण जोहर तसा हॅपी गो लकी. त्याचे हेच गुण त्याची मुलं रुही आणि यश यांच्यात आलेत. करण नेहमीच आपल्या मुलांचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्या तो काॅफी विथ करणच्या सहाव्या सीझनमध्ये बिझी आहे. पहिल्याच भागात आलिया आणि दीपिका आहेत. याच भागात करणचं एक गुपित उघड होणार. हे फक्त दीपिकालाच माहीत होतं.

या भागामध्ये दीपिका आणि आलिया आपल्या लव्हलाइफबद्दल सांगणार आहेतच. पण दीपिकाला करणचं एक सीक्रेट ठाऊक आहे. जे त्याच्या आईलाही माहीत नव्हतं. करणनं आपल्या दोन मुलांबद्दल फक्त दीपिकाला अगोदर सांगितलं होतं. करणनं ते सगळ्यांना सांगेपर्यंत दीपिकानं अजिबात तोंड उघडलं नव्हतं.

दीपिका आणि करण चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते एकमेकांजवळ बऱ्याच गोष्टी शेअर करतात. करण सरोगसीनं वडील बनलाय.

‘कॉफी विथ करण सीझन-6‘ ला आजपासून ( 21 आॅक्टोबर ) सुरुवात होणार असून बॉलिवूडमधील निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने गेल्या 14 वर्षांपासून कार्यक्रमाचे पाच सीझन केले आहेत आणि आता सहावा सीसन आपल्या भेटीला आणला आहे. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना बोलवून त्यांची मुलाखत घेण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात येतो.

कॉफी विथ करणचा सीझन-6 हा गर्ल्स पॉवर या विषयावर आधारित आहे. म्हणूनच तरुणांच्या पसंतीच्या आणि अल्पावधीत इंडस्ट्रीमध्ये यश मिळवणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण या दोघींपासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. शोमध्ये या दोघी मनमोकळेपणाने गप्पा मारत रणबीर कपूरच्या प्रवासाबाबत बोलताना दिसणार आहेत.

बॉलिवूडमध्ये नुकताच प्रवेश केलेली अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सलमानचा फॅन अर्जुन कपूर यांनासुद्धा कार्यक्रमात बोलवण्यात आलं. ही सावत्र भावंडं आपापल्या आयुष्यातील काही किस्से सांगत कार्यक्रमात अधिक रंगत आणतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2018 01:59 PM IST

ताज्या बातम्या