Home /News /entertainment /

करण जोहरच्या 50व्या वाढदिवसाचं होणार ग्रॅन्ड सेलिब्रेशन; ठिकाण,शेफ ते गेस्ट जाणून घ्या सर्व डिटेल्स

करण जोहरच्या 50व्या वाढदिवसाचं होणार ग्रॅन्ड सेलिब्रेशन; ठिकाण,शेफ ते गेस्ट जाणून घ्या सर्व डिटेल्स

बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता (Bollywood Director & Producer) करण जोहर आज आपला 50 वा (Karan Johar 50th Birthday) वाढदिवस साजरा करत आहे. करण जोहर आपला 50 वा वाढदिवस खास बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीय.

    मुंबई, 25 मे-  बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता   (Bollywood Director & Producer)  करण जोहर आज आपला 50 वा   (Karan Johar 50th Birthday)  वाढदिवस साजरा करत आहे. करण जोहर आपला 50 वा वाढदिवस खास बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीय. आज तो मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये एक भव्य पार्टी आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. करण जोहर नेहमीच त्याच्या भव्यदिव्य पार्ट्यांसाठी ओळखला जातो. याआधी त्याने धर्मा प्रॉडक्शनच्या सीईओ अपूर्वा मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रॅन्ड पार्टीही दिली होती. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.आजसुद्धा करणच्या पार्टीमध्ये मोठमोठे सेलेब्रेटींची रेलचेल असणार आहे. करण जोहरने वाढदिवसापूर्वी आपल्या पार्टीच्या थीमपासून ते खाण्यापर्यंत प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींवर विशेष लक्ष दिल्याचं सांगितलं जात आहे. पार्टीला संस्मरणीय बनवण्यासाठी या निर्मात्याने दोन सेलिब्रिटी शेफचाही समावेश केला आहे. विशेष बाब म्हणजे या दोन शेफपैकी एकाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासाठीही जेवण बनवलं आहे.यावरुन आपण आता पार्टीच्या भव्यतेचा अंदाज लावू शकतो. करण जोहरने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत कुकिंगसाठी प्रसिद्ध शेफ मारुत सिक्का आणि हर्षा किलाचंद यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. मुंबईत राहणारा, हर्षा आपल्या स्वादिष्ट मिठाई, कुरकुरीत कुकीज, आणि तोंडात पाणी आणणाऱ्या चॉकलेट्ससाठी ओळखला जातो आणि दक्षिण मुंबईत हे नाव प्रसिद्ध आहे. तर दुसरीकडे मारुत सिक्का यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासाठी जेवण बनवले आहे आणि त्यांनी अनेक पुरस्कार विजेते रेस्टॉरंट्सही सुरू केले आहेत.एकंदरीतच पार्टीतचा मेन्यू फारच खास असणार हे निश्चित. आपण नेहमीच पाहतो की बॉलिवूडच्या बड्या पार्ट्यांमध्ये विविध थीम ठेवल्या जातात. त्यामुळे करण जोहरच्या या रॉयल पार्टीची थीम काय असणार याची अनेकांना उत्सुकता आहे. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, या पार्टीची थीम ब्लॅक अँड ब्लिंग आहे. तर बॅशचा संपूर्ण सेटअप अमृता महल यांनी डिझाइन केला आहे. अमृता महलने कलंक, ये जवानी है दिवानी, ब्रह्मास्त्र आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी यांसारख्या चित्रपटांसाठी सेट तयार केले आहेत. करण जोहरच्या या खास क्षणात चित्रपटसृष्टीतील सर्व मोठे कलाकार सहभागी होतील अशी अपेक्षा केली जात आहे.दरम्यान करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या पाहुण्यांच्या यादीत ‘जुग जुग जिओ’चे कलाकार अर्थात अनिल कपूर, कियारा आडवाणी, वरुण धवन, नीतू कपूर हे कलाकारही दिसणार आहेत. याशिवाय आलिया भट्ट, रणबीर कपूर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहरुख खान यांसारखे स्टार्सही पार्टीत धमाल करताना दिसणार आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Karan Johar

    पुढील बातम्या