जान्हवी आणि इशानला वैतागून करण जोहरने सगळ्यांनाच दिली शिक्षा!

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सिनेनिर्माता करण जोहर खूप चिंतेत आहे. आणि त्याच्या चिंतेचं कारण आहे जान्हवी आणि इशान.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 13, 2018 11:36 AM IST

जान्हवी आणि इशानला वैतागून करण जोहरने सगळ्यांनाच दिली शिक्षा!

13 मार्च : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सिनेनिर्माता करण जोहर खूप चिंतेत आहे. आणि त्याच्या चिंतेचं कारण आहे जान्हवी आणि इशान. ते झालं असं की, वेळोवेळी जान्हवी आणि इशानच्या शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर लिक होत आहेत. त्यामुळे सिनेमाबद्दल आणि सिनेमाच्या लोकेशनबद्दल सोशल मीडियावर माहिती व्हायरल होत आहे. या सगळ्यामुळे करण जोहर पुरता वैतागला आहे.

आता या सगळ्यावर उपाय म्हणून करण जोहरने सगळ्यांनाच शिक्षा दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी शूटिंग होणारं त्या त्या सेटवर कोणालाही मोबाईल घेऊन जाण्यास साफ मनाई करण्यात आली आहे. करण जोहरच्या शिक्षेमुळे कलाकारांसोबत सगळ्यांनाच याचा त्रास होतोय.

करण जोहरच्या या शिक्षेमुळे सगळेजण सेटवर मोबाईलशिवाय काम करतात. पण हे सेटवरचे नियम झालं. सेटबाहेर गेल्यावर मात्र आम्ही कोणाला थांबवू शकत नाही असं दिग्दर्शक शशांक खेतान यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे आता या कठोर शिक्षेनंतरही सिनेमाबद्दल गोपनीयता राखली जातेय का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 11:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close