मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'स्टारकिड्स जन्माला येतात तेव्हा आई नव्हे तर धर्मा...; Karan Johar वर कॉमेडियनने साधला निशाणा

'स्टारकिड्स जन्माला येतात तेव्हा आई नव्हे तर धर्मा...; Karan Johar वर कॉमेडियनने साधला निशाणा

Karan Johar

Karan Johar

दिग्दर्शक-निर्माता आणि होस्ट करण जोहर त्याच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये सेलिब्रिटींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारताना दिसतो. पण आता हे प्रकरण काहीसं उलट झालं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 8 सप्टेंबर-   दिग्दर्शक-निर्माता आणि होस्ट करण जोहर त्याच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये सेलिब्रिटींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारताना दिसतो. पण आता हे प्रकरण काहीसं उलट झालं आहे. 'केस तो बनता है' या रितेश देशमुखच्या कॉमेडी शोमध्ये आता करण जोहर हजेरी लावणार आहे. दरम्यान रितेश त्याच्यावर मजेशीर प्रश्नांची सरबत्ती करणार आहे. सध्या या एपिसोडचा प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे.

या शोमध्ये कॉमेडियन परितोष त्रिपाठीने करण जोहरला मजेशीर प्रश्न विचारत म्हटलं. "जेव्हा एखादा स्टार किड जन्माला येतो तेव्हा तो सर्वप्रथम 'आई' नव्हे तर 'धर्मा' म्हणत असणार. त्याचं कारण असं आहे की, करण जोहर आपल्या चित्रपटातून जास्तीत-जास्त स्टारकिड्सना संधी देत असतो. त्यामुळे बऱ्याचवेळा त्याच्यावर नेपोटीझमचे आरोप लावले जातात. त्यामुळेच त्याला हा प्रश्न मजेशीर पद्धतीने विचारण्यात आला होता.

हे सर्व इतक्यावरच थांबत नाही. करणला पुढे अनेक पेचात पाडणारे प्रश्न मजेशीररित्या विचारण्यात येतात. त्यानंतर अभिनेता आणि होस्ट रितेश देशमुखसुद्धा आपल्या टीमसोबत सामील होतो आणि करण जोहरला प्रश्न विचारण्यास सुरुवात करतो. करण काय बोलावं हेच सुचत नाही.त्यामुळे तो म्हणतो तुम्ही असे प्रश्न विचारत आहात. मी काय बोलू कळत नाहीय'.इतकं बोलून करण ते सर्व प्रश्न मजेमध्ये टाळून देतो.

" isDesktop="true" id="757857" >

(हे वाचा:Katrina kaif: विकी कौशल माझ्या रडारवर कधीच नव्हता'; लग्नानंतर कतरिनाचा धक्कादायक खुलासा )

'केस तो बना है' हा एक साप्ताहिक कॉमेडी शो आहे ज्यामध्ये रितेश देशमुख आणि वरुण शर्मा वकील म्हणून दिसत आहेत. तर सोशल मीडियावर प्रभाव टाकणारी कुशा कपिलासुद्धा यामध्ये दिसून येत आहे. त्याचवेळी या शोमध्ये कॉमेडियन परितोष त्रिपाठी, गोपाल दत्त, संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा यांच्यासह इतर कलाकार कॉमेडी करताना दिसून येतात.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Karan Johar, Riteish Deshmukh