मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

करण जोहर मांडणार मुलांच्या संगोपनाचे अनुभव, लवकरच प्रकाशित होणार हे पुस्तक

करण जोहर मांडणार मुलांच्या संगोपनाचे अनुभव, लवकरच प्रकाशित होणार हे पुस्तक

गेले काही महिने चर्चेत असलेल्या निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. करणने एक खास घोषणा केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 01 सप्टेंबर : सोशल मीडियावर गेले काही महिने चर्चेत असलेल्या निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान लॉकडाऊन काळात त्याने त्याची मुलं रूही आणि यश यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. या पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस देखील उतरल्या होत्या. दरम्यान करण जोहरच्या पॅरेंटिंगचे देखील त्याच्या मित्र परिवाराकडून नेहमी कौतुक झाले आहे. आता तो त्याचा हा अनुभव पुस्तकातून मांडणार आहे. करणने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर करत घोषणा केली आहे. करण त्याच्या मुलांचे पिक्चर बुक घेऊन येणार आहे. या नवीन पुस्तकाबाबत करणने म्हटले आहे की, 'एक स्पेशल गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करताना मी खूप उत्साही आहे. लहान मुलांसाठी माझे पहिले 'पिक्चर बुक' येणार आहे'. करणने यावेळी ट्विंकल खन्ना हिचे देखील मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत. त्याने रुही आणि यशचे संगोपन आतापर्यंत कसे केले याचा अनुभव सांगणारे हे पुस्तक असणार आहे. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की काही मजेशीर अनुभव या पुस्तकात असणार आहेत. (हे वाचा-काजोलनं घेतला भारत सोडण्याचा निर्णय, मुलीमुळे 'या' देशात होणार शिफ्ट) या पुस्तकामध्ये मुलगा आणि मुलीचे संगोपन करताना केल्या जाणाऱ्या फरकाबाबत भाष्य करण्यात आले आहे. यामध्ये लव आणि कुश या जुळ्यांची कहाणी आहे.
(हे वाचा-12 जूनला रिया चक्रवर्ती सुशांतच्याच घरी होती? सोशल मीडियावर PHOTO VIRAL) दरम्यान या पुस्तकासाठी करणला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा, दिया मिर्झा, मलायका अरोरा यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी करणने आत्मचरित्र 'अॅन अनसुटेबल बॉय' देखील लिहिले आहे. यामध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी, घटनांचा उलगडा केला आहे. 9 जानेवारी 2017 रोजी ऑटोबायोग्राफी प्रदर्शित करण्यात आली होती. आता करणच्या चाहत्यांना त्याच्या नव्या पुस्ताकाची प्रतीक्षा आहे.
First published:

Tags: Karan Johar

पुढील बातम्या