मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मधुर भांडारकर यांची करण जोहरसाठी भलीमोठी पोस्ट; म्हणाले...

मधुर भांडारकर यांची करण जोहरसाठी भलीमोठी पोस्ट; म्हणाले...

मधुर भांडारकरने (Madhur Bhandarkar) करण जोहरच्या (Karan Johar)माफीला उत्तर दिलं आहे. त्याने ट्विटरवर एक भलीमोठी पोस्ट लिहीत काही सगळ्या वादाला पूर्णविराम दिला आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 27 डिसेंबर: मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) आणि करण जोहरच्या (Karan Johar) वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे, असंच दिसत आहे. काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या ‘बॉलिवूड वाइव्ज’ या सिनेमावरुन करण आणि मधुरमध्ये वादाची सुरुवात झाली होती. अपूर्व मेहता यांचं नाव न घेता त्यांनी चित्रपटाच्या नावाची कॉपी केल्याचा आरोप केला होता. त्याबद्दल करण जोहरने माफी मागितली होती.

करण जोहरच्या पोस्टमध्ये काय आहे?

करण जोहरने मधुर भांडारकरला टॅग करत भली मोठी पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने लिहीलं होतं की, ‘प्रिय मधुर.. आपण एकाच क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहोत. मला स्वत:लाही तुझं काम खूप आवडतं. मला असं समजलं आहे की, तू माझ्यावर नाराज आहेस. त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. माझ्या आगामी वेब सीरिजचं नाव फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलिवूड वाइव्ज असं ठेवलं आहे. पण तुझ्या आणि माझ्या कलाकृती फारच वेगळ्या आहेत.’

मधुर भांडारकरचं उत्तर काय?

करण जोहरच्या पोस्टवर मधुर भांडारकरने तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. त्यानेही करणला टॅग करत एक भलीमोठी पोस्ट लिहीली आहे. त्यात मधुरने लिहीलं आहे की, ‘आपल्या क्षेत्रात विश्वास ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. ट्रेंड असोसिएशनने नकार दिल्यावर तुम्ही ते नाव वापरलं पण त्यामुळे मला अडचणींचा सामना करावा लागला. पण ठीक आहे. मी तुझी माफी स्वीकारतो आणि हा वाद इथेच संपवतो. तुला तुझ्या नव्या प्रोजेक्ट्ससाठी शुभेच्छा’

नेमका वाद काय?

मधुर भांडारकर सध्या एका चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचं नाव आहे, ‘बॉलिवूड वाइव्ज’ तर काही दिवसांपूर्वी अपूर्व मेहता आणि करण जोहर यांनी एका वेब सीरिजची घोषणा केली. ज्याचं नाव आहे. ‘फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलिवूड वाइव्ज’ (Fabulous Lives of Bollywood Wives) नावामध्ये बरचसं साम्य असल्यामुळे मधुर भांडारकरने करण जोहरवर टीका केली होती.

First published:

Tags: Bollywood, Karan Johar, Web series