Home /News /entertainment /

Happy 50th Birthday Karan Johar: 'कोणी म्हणेल मिड लाईफ क्रायसिस मी मात्र...' करणची 50 व्या वाढदिवशी केलेली बेधडक Post Viral!

Happy 50th Birthday Karan Johar: 'कोणी म्हणेल मिड लाईफ क्रायसिस मी मात्र...' करणची 50 व्या वाढदिवशी केलेली बेधडक Post Viral!

Karan Johar Viral Post: बॉलिवूडचा केजो आज अखेर वयाच्या पन्नाशीत पदार्पण करतो आहे. पन्नाशीनंतर करिअरमध्ये भरारी घेणारे अनेक अभिनेते, दिग्दर्शक बॉलिवूडमध्ये आहेत. करणचं नाव सुद्धा यात घ्यायला हरकत नाही. सध्या वाढदिवसाच्याच दिवशी तो वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई 25 मे: बॉलिवूडचा लाडका दिग्दर्शक, निर्माता आणि धर्मा प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा करण जोहर (Karan Johar) आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. साधारण पन्नाशीच्या घरात पोहोचल्यावर करिअरला रामराम ठोकण्याची प्रथा बॉलिवूडमध्ये प्रचलित असताना करणने त्याच्या 50 व्या वाढदिवसाला (Karan Johar Birthday)केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. (Karan Johar viral post) करण जोहर अगदी 50 वर्षांचा झाला तरी त्यात लपलेलं लहान मिलेनियल मूल बाहेर काढणं अशक्य आहे. करण ज्या अंदाजात वावरतो त्यामुळे त्याच्याबद्दल होणाऱ्या चर्चा थांबत नाहीत. आज वयाची गोल्डन जुबली पार केल्यावरही त्याचा दिसणारा उत्साह कौतुकास्पद आहे. करण पोस्टमध्ये असं म्हणतो, "आज मी 50 वर्षांचाझालो. आज मी वयाच्या अश्या टप्प्यावर पोहोचलो आहे ज्याला भयानक स्वप्न म्हणून पाहिलं जातं. हा माझ्या आयुष्याचा मिड पॉईंट आहे याची मला जाणीव आहे पण माझ्यातील वॉनबि मिलेनिअल मुलाला रोखू शकत नाही. काहींना हा मिड लाईफ क्रायसिस वाटेल पण मी मात्र 'ए लाईफ विदाऊट अपॉलॉजी' असं म्हणत निर्विवाद आयुष्य असं या जगण्याला नाव देतो." यापुढे जाऊन तो त्याच्या फिल्म करिअरबद्दलही सांगतो. करणने 27 वर्ष बॉलिवूडमध्ये काम करत उत्तोमत्तम चित्रपट दिले आहेत. कथा सांगणे, टॅलेंटला पुढे आणणे आणि अनेक महान कलाकारांना स्वतःच्या डोळ्यांपुढे जादुई परफॉर्मन्स देताना पाहणं याबद्दल तो कृतज्ञता व्यक्त करतो.
  View this post on Instagram

  A post shared by Karan Johar (@karanjohar)

  करणने केली मोठी घोषणा! याव्यतिरिक्त करणने एक मोठी घोषणा सुद्धा केली आहे. करणला त्याच्या दिग्दर्शनातील ब्रेकबद्दल कायम विचारणा होते. आता शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. यात चित्रपटाचं नाव रिव्हिल केलं नसून हा एक पॉवरपॅक ऍक्शन चित्रपट असणार आहे असं समजतं. याचं शूटिंग 2023 एप्रिलमध्ये सुरु होणार आहे. तसंच 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या बहुचर्चित चित्रपटाची रिलीज डेट सुद्धा त्याने यात सांगितली आहे. रॉकी और रानी की प्रेमकहानी मध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग ही जोडी दिसणार आहे. करणचं अत्तापर्यंतचं करिअर फार ग्लॅमरस तरीही कॉन्ट्रोवर्शियल राहिलं आहे. आता त्याच्या पुढच्या आयुष्यात तो काय करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. करण येत्या काळात कॉफी विथ करणच्या नव्या सीजनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
  First published:

  Tags: Birthday celebration, Karan Johar

  पुढील बातम्या