मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: ये प्यार का बंधन है! ‘करण-अर्जुन’मधील ते दृश्य पाहून सलमान झाला भावूक

VIDEO: ये प्यार का बंधन है! ‘करण-अर्जुन’मधील ते दृश्य पाहून सलमान झाला भावूक

आज 25 वर्षांनंतरही करण-अर्जुनमधील गाणी आणि डायलॉग्स मोठ्या आवडीने पाहिले जातात. दरम्यान या चित्रपटातील एक दृश्य पाहून सलमान आणि शाहरुख भावूक झाले. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

मुंबई, 19 फेब्रुवारी: करण-अर्जुन (Karan Arjun) बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सलमान खान आणि शाहरुख खानच्या (Shahrukh Khan Salman Khan) जबरदस्त केमिस्ट्रीमुळं 90 च्या दशकात हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आजही या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्स तितकेच आवडीने पाहिले जातात. दरम्यान या चित्रपटातील एक दृश्य पाहून सलमान आणि शाहरुख भावूक झाले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध गायक गुरु रंधावा यानं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख आणि सलमान करण अर्जुन या चित्रपटातील ये बंधन तो प्यार का बंधन है हे गाणं पाहताना दिसत आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे हे गाणं पाहून दोघंही भावूक झाले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होता आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत या दृश्याची स्तुती केली आहे.

अवश्य पाहा - जॅकलिन राहाते प्रियांकाच्या घरात; एका महिन्याचं भाडं ऐकून येईल चक्कर

करण अर्जून हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झाला होता. या मल्टिस्टारर चित्रपटात सलमाननं करण तर शाहरुखनं अर्जुन ही व्यक्तिरेखा साकारली होती. हा चित्रपट पुर्नजन्म या संकल्पनेवर आधारित आहे. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी करण आणि अर्जुन पुर्नजन्म घेतात असं कथानक या चित्रपटात पाहायला मिळतं. जबरदस्त गाणी, फाईटिंग, आणि नामांकित स्टारकास्टमुळं हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, Salman khan, Shahrukh khan, Star celebraties