वरूण पाठोपाठ करणनेही मागितली कंगनाची माफी

वरूण पाठोपाठ करणनेही  मागितली कंगनाची माफी

सैफ अली खान, वरुण धवन आणि करण जोहरने 'नेपोटिझम रॉक्स' म्हणत कंगनावर टीका केली होती.

  • Share this:

19 जुलै: वरूण धवन पाठोपाठ आयफाच्या मंचावर टीका केल्याबद्दल आता करणने ही कंगनाची माफी मागितली आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयफाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सैफ अली खान, वरुण धवन आणि करण जोहरने 'नेपोटिझम रॉक्स' म्हणत कंगनावर टीका केली होती.

कंगना राणावतचा बॉलिवूडमध्ये 'स्टार किड्स'प्रती होत असलेल्या पक्षपातीपणाला असलेला विरोध जगजाहीर आहे. करण जोहरला दिलेल्या मुलाखतीत तिने या पक्षपातीपणाला असलेला विरोध प्रकटही केला होता. याचीच आयफाच्या मंचावर न्यूयॉर्कमध्ये सैफ ,करण आणि वरूणने खिल्ली उडवली होती. सैफ आणि करण या सोहळ्याचे सूत्रसंचालन करत होते. जेव्हा वरूण धवन त्याला जाहीर झालेला कॉमिक रोलचा पुरस्कार घ्यायला स्टेजवर आला तेव्हा सैफने वरूणला त्याचे वडील दिग्दर्शक असल्याची आठवण करून दिली. वरूणने हा जोक हसण्यावारी नेला आणि 'बोले चुडिया बोले कंगना' हे गाणं गुणगुणायला लागला. त्यावर करण म्हणाला ,"कंगना नाही बोलली तरच बरंय किती बोलते यार". या साऱ्यामुळे सोशल मीडियावर या तिघांवर प्रचंड टीका झाली होती.

पण आता करणने झालेल्या प्रकाराबाबत कंगनाची माफी मागितली आहे. माझा घराणेशाहीवर विश्वास नाही.आम्ही केलेल्या विनोदाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि त्या विनोदाची कल्पनाही माझीच होती असं म्हणत करणने कंगनाची माफी मागितली आहे. एवढंच नव्हे तर करणने कंगनाचं एक उत्तम अभिनेत्री म्हणत कौतुकसुद्धा केलंय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 04:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading