26 डिसेंबर : शशी कपूर आता या जगात नाहीत, पण कपूर खानदानानं त्यांचा प्रथा काही मोडली नाही. याही वर्षी त्यांच्या घरी ख्रिसमस पार्टीचं जंगी आयोजन केलं होतं. आणि या पार्टीत सेंटर आॅफ अॅट्रॅक्शन होता तैमुर.
तैमुर या पार्टीत करिना-सैफसोबत चालतच आला. आणि मग त्याचा ताबा घेतला मामा रणबीर कपूरनं. पूर्ण पार्टीत रणबीर तैमुरसोबत खेळत होता. मामा-भाच्याची ही जोडी जाम धमाल करत होती.
Today at lunch. Ranbir with Taimur,his uncle. Christmas pic.twitter.com/qczNXd3T6n
Loading...— Rishi Kapoor (@chintskap) 25 December 2017
याशिवाय या पार्टीत सैफ, करिना, करिश्मा, रणबीर, ऋषी कपूर, नीतू कपूर, कृष्ण राज कपूर, आदर जैन आणि अरमान जैन, रणधीर कपूर उपस्थित होते.
कपूर कुटुंबाची प्रत्येक गोष्ट चर्चेत असते. कपूर यांचा गणपती, होळी एके काळी टाॅक आॅफ द टाऊन होते. आता कपूर कुटुंबाचा नाताळही खूप चर्चेत राहिला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा