मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सूनांसाठी कपूर फॅमिलीत आहे मोठी 'अट', आलिया भट्ट करणार का फॉलो?

सूनांसाठी कपूर फॅमिलीत आहे मोठी 'अट', आलिया भट्ट करणार का फॉलो?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) या लव्ह बर्ड्सनी काल (14 एप्रिल 2022) लग्नगाठ बांधली. मुंबईतील प्रसिद्ध आर.के. हाऊसमध्ये (RK House) मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. लग्नांतर आलिया भट्ट आता कपूर कुटुंबाची (Kapoor Family) सून झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) या लव्ह बर्ड्सनी काल (14 एप्रिल 2022) लग्नगाठ बांधली. मुंबईतील प्रसिद्ध आर.के. हाऊसमध्ये (RK House) मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. लग्नांतर आलिया भट्ट आता कपूर कुटुंबाची (Kapoor Family) सून झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) या लव्ह बर्ड्सनी काल (14 एप्रिल 2022) लग्नगाठ बांधली. मुंबईतील प्रसिद्ध आर.के. हाऊसमध्ये (RK House) मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. लग्नांतर आलिया भट्ट आता कपूर कुटुंबाची (Kapoor Family) सून झाली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 एप्रिल-    बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) या लव्ह बर्ड्सनी काल (14 एप्रिल 2022) लग्नगाठ बांधली. मुंबईतील प्रसिद्ध आर.के. हाऊसमध्ये (RK House) मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. लग्नांतर आलिया भट्ट आता कपूर कुटुंबाची (Kapoor Family) सून झाली आहे. आलियापूर्वी गीता बाली, बबिता शिवदासानी, नीतू सिंग, जेनिफर कँडल यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडची फर्स्ट फॅमिली म्हणवल्या जाणाऱ्या कपूर कुटुंबात सून (Daughter In Law) म्हणून एंट्री केलेली आहे. पण, यातील बहुतेक जणींनी कपूर कुटुंबाच्या प्रथेनुसार करिअरच्या सुवर्णकाळात असूनही लग्नानंतर इंडस्ट्रीत काम करणं सोडलं होतं. आपल्या कुटुंबातील लेकी-सूनांनी चित्रपटात काम करू नये, अशी राज कपूर (Raj Kapoor) यांची इच्छा होती. त्यामुळे कपूर कुटुंबात नव्यानं सून म्हणून दाखल झालेली आलिया ही प्रथा पाळणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

राज कपूर यांनी आपल्या कुटुंबातील मुली (Daughters) आणि सूना (Daughter in Law) चित्रपटात काम करणार नाहीत, असा नियम केला होता. आपण तयार केलेल्या या नियमाचं म्हणा किंवा आता झालेल्या प्रथेचं पालन करण्यासाठी त्यांनी आपल्या पहिल्या प्रेमाचाही त्याग केला होता. राज कपूर यांना प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिसशी लग्न करायचं होतं. पण, लग्नानंतर नर्गिसला चित्रपटात काम करता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. नर्गिस यांच्यावर स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी होती. चित्रपटात काम करूनच नर्गिसला आपलं घर चालवायचं होतं. म्हणून नर्गिसनं राज कपूर यांच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.

कालांतरानं बबिता शिवदसानी आणि नीतू सिंग या कपूर कुटुंबात सून म्हणून दाखल झाल्या. या दोघींनी जेव्हा लग्न केलं होतं तेव्हा त्या आपल्या करिअरच्या सर्वोच्च स्थानी होत्या. तरीदेखील राज कपूर यांच्या नियमाचं (Raj Kapoor Rule) पालन करण्यासाठी त्यांनी करिअरवर पाणी सोडलं. एका अभिनेत्याची मुलगी असलेल्या बबिता जेव्हा चित्रपटात आल्या तेव्हा त्यांना खूप यश मिळालं. ‘एक हसीना दो दीवाने’, ‘पहचान’, ‘डोली’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या बबितानं रणधीर कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर अॅक्टिंग (Acting) सोडून दिली. कपूर्सची सून झालेल्या बबिता यांनी आपलं करिअर सोडून दिलं. बबितांपाठोपाठ कपूर कुटुंबात आलेल्या नीतू सिंग (Neetu Singh) यांनीही या प्रथेचं पालन करत अॅक्टिंग सोडून दिली. नीतू यांनी करिअरच्या सुवर्णकाळात असताना ऋषी कपूरशी लग्न केलं होतं. लग्नानंतर 1980 मध्ये त्यांनी बॉलिवूड सोडून दिलं. पण, नीतूचं म्हणणं होतं की, कुटुंबाच्या प्रथेमुळे नाही तर स्वत:साठी त्यांनी अॅक्टिंग करिअर सोडलं होतं. त्यानंतर 29 वर्षांनी 'लव्ह आज कल' चित्रपटातून नीतू सिंग यांनी ऋषी कपूरसोबत कमबॅक केलं होतं.

राज कपूर यांनी फक्त सुनांसाठीच नाही तर मुलींसाठीदेखील हाच नियम केला होता. पण बबिता आणि रणधीर कपूर यांच्या मुलींनी राज यांचा नियम मोडण्याचं धाडस केलं. जेव्हा बबिता रणधीर कपूरपासून वेगळ्या राहू लागल्या तेव्हा त्यांनी आपली मोठी मुलगी करिश्माला अॅक्टिंग करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. करिश्माच्या चित्रपटांमध्ये येण्यामुळे कपूर कुटुंबीय नक्कीच रागावले होते. करिश्मा कपूरपूर्वी (Karishma Kapoor) शशी कपूर आणि जेनिफर कँडल यांची मुलगी संजनानं बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला यश मिळालं नाही. करिश्माला करिअरच्या सुरुवातीपासून प्रचंड यश मिळालं. तेव्हापासून खऱ्या अर्थानं कपूर कुटुंबातील मुलींसाठी इंडस्ट्रीचे दरवाजे खुले झाले.

कपूर कुटुंबातील मुलींनी राज कपूर यांचा नियम पाळला नाही. पण, यासाठी त्यांना त्यांच्या काकूकडून प्रेरणा मिळाली होती, असं म्हटलं तरी चालेल. कारण, शम्मी कपूर यांची पहली पत्नी असलेल्या गीता बाली यांनी राज कपूर यांचा नियम पाळण्यास स्पष्ट नकार दिला होता. गीता बाली (Geeta Bali) यांनी शम्मी कपूरसोबत लग्न केल्यानंतरही आपलं अॅक्टिंग करिअर सोडलं नव्हतं. लग्नानंतर गीता यांनी आठ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. आता आलिया आपल्या दिवंगत आजेसासूच्या पावलावर पाऊल ठेवत अॅक्टिंग करिअर सुरू ठेवणार की, सोडून देणार याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.

गेल्या 10 वर्षांपासून आलिया इंडस्ट्रीचा एक महत्त्वाचा घटक आहे. सध्या तिच्या नावे असलेल्या चित्रपटांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत आलिया भट्टचा समावेश होतो. ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर ती आता सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘ब्रह्मास्र’, ‘डार्लिंग्ज’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटांत दिसणार आहे. ब्रह्मास्र ही एक फँटसी फिल्म असून त्यासाठी 300 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 'डार्लिंग्ज'च्या निर्मात्यांनीही आतापर्यंत 15 कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं दिग्दर्शित केलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’साठी जवळपास 50 कोटींचं बजेट ठेवलं आहे. आलियाच्या आगामी चित्रपटांवर 375 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या फक्त 29 वर्षांची असल्यामुळे तिला करिअर करण्यासाठी भविष्यात चांगली संधी आहे. शिवाय, ती वर्षानुवर्षे इंडस्ट्रीशी जोडलेल्या भट्ट कुटुंबातील मुलगी आहे. अशा परिस्थितीत आलियाला चित्रपट सोडणं कठीण जाणार आहे. ती काय निर्णय घेते हेच पहावं लागेल.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor