मुंबई, 04 डिसेंबर : अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘गुड न्यूज’च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. या दरम्यान टीव्हीचा कॉमेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिल शर्मा आणि त्याच्या पूर्ण टीमनं अक्षय कुमारला खुलं चॅलेंज दिलं आहे. कपिल शर्मा आणि त्याच्या टीमनं अक्षयला चॅलेंज देताना म्हटलं, हिम्मत असेल तर ये. या चॅलेंजच्या मागे अक्षय कुमारचीच सकाळी लवकर उठण्याची सवय कारणीभूत आहे. अक्षयच्या याच सवयीमुळे कपिलनं त्याला चॅलेंज केलं आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अक्षय कुमारला चॅलेंज करतानाचा व्हिडीओ कपिलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्या व्हिडीओमध्ये त्याची संपूर्ण टीम म्हणजेच भारती सिंह, कृष्णा अभिषेक कीकू शारदा आणि चंदन प्रभाकर दिसत आहेत.
सिनेमांच्या बीझी शेड्युलमध्ये फिटनेस जपण्यासाठी काय करते कतरिना कैफ
या व्हिडीओमध्ये कपिल सांगत आहे, ‘गुड मॉर्निंग मित्रांनो, यावेळी सकाळचे 3 वाजले आहेत. अक्षय पाजी, तुला आमचं चॅलेंज आहे... मागच्या वेळी तू आम्हाला 6 वाजता उठवलं होतं. आता आम्ही 3 वाजताच जागे झालो आहोत. हिम्मत असेल तर 4 वाजता शूटिंग करायला ये. आम्ही जागे आहोत. ही होती आमची गुड न्यूज.’ या व्हिडीओमध्ये कपिलची टीम त्याला चिअरअप करताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच अक्षयचा ‘हाउसफुल 4’ हा सिनेमा रिलीज झाला. त्यापूर्वी या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला होता. मात्र या शूटिंगसाठी कपिल शर्मा आणि त्याच्या टीमला पहाटे 4 वाजता उठून सर्व तयारी करावी लागली होती. इतकंच नाही तर अक्षयच्या सकाळी लवकर उठण्याच्या या सवयीचा फटका को-स्टार रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांनाही बसला होता. या दोघांनी तर या सेटवरचा एक व्हिडीओच सोशल मीडियावर शेअर केला होता.
Tanhaji सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, अजय देवगणचा हटके अंदाज
यावर्षी अक्षय कुमारचे बरेच सिनेमा रिलीज झाले आणि त्याच्या प्रत्येक सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्यानं कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. ‘हाउसफुल 4’ नंतर आता अक्षय त्याचा आगामी सिनेमा ‘गुड न्यूज’च्या प्रमोशनसाठी या शोमध्ये येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत करिना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
रणबीर कपूरने सोडलेल्या या 5 सिनेमांमुळे सुपरस्टार झाला रणवीर सिंह