'फिरंगी'च्या रिलीजनंतर कपिल शर्माचं शुभमंगल

'फिरंगी'च्या रिलीजनंतर कपिल शर्माचं शुभमंगल

'फिरंगी' रिलीज झाल्यानंतर कपिल शर्मा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. फिरंगी 10 नोव्हेंबरला रिलीज होतोय.

  • Share this:

05 नोव्हेंबर : कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या त्याचा आगामी सिनेमा 'फिरंगी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण आता लवकरच तो त्याच्या लग्नाची तारीख जाहीर करणार आहे. 'फिरंगी' रिलीज झाल्यानंतर कपिल शर्मा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. फिरंगी 10 नोव्हेंबरला रिलीज होतोय.

तो त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चित्रार्थसोबत लग्न करणार आहे. कपिलने सांगितलं की त्यांचं लग्न दोघांच्या घरच्यांच्या परवानगीनं होत आहे.असं सांगितलं जातं की, लग्नाआधी गिन्नीने कपिलला एक अट घातली आहे, ती म्हणजे त्याने लग्नाआधी दारू पिणं सोडावं, त्यानंतरच लग्न होणार. पण आता या लग्नाच्या चर्चांमुळे कपिलंने दारू सोडली का? असा प्रश्न आहे.

गिन्नीच्या आई-वडिलांची इच्छा आहे की त्यांनी लवकरच त्यांच्या नात्याविषयी आणि लग्नाविषयी सगळ्यांना सांगावं. म्हणूनच हे दोघेही लग्नाच्या घाईत आहेत.

कपिल शर्माचा शो बंद झाल्यानंतर त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा चांगल्याच वाढल्या होत्या. पण आता फिरंगीच्या रिलीजनंतर तो परत टीव्हीवर झळकणार असल्याचं दिसतंय.

त्याचबरोबर त्याला सुनील ग्रोवरसह काम करण्याचीही इच्छा अाहे. त्यामुळे कपिल आणि सुनील ग्रोवरची कॉमेडी आपल्याला परत पहायला मिळणार आहे, असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2017 04:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading