Elec-widget

VIDEO VIRAL : प्रियांकाची अभिनेत्याला ऑफर; 2 कोटी की हॉट गर्ल्ससोबत हॉलीडे ट्रिप!

VIDEO VIRAL : प्रियांकाची अभिनेत्याला ऑफर; 2 कोटी की हॉट गर्ल्ससोबत हॉलीडे ट्रिप!

The Kapil Sharma Show : प्रियांका चोप्राने दिलेली ऑफर कपिल शर्माने नाकारली कारण...

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर: मनोरंजन आणि हास्याचा धमाका म्हणून द कपिल शर्मा शो प्रसिद्ध आहे. सध्या कपिल शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा आणि कपिल दिसत आहेत. कपिल शर्मा वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेत असतात मात्र यावेळी प्रियांका चोप्राने दिलेल्या ऑफरमुळे जास्त चर्चेचा विषय बनले आहेत.

या व्हिडिओमध्ये कपिल शर्माच्या कार्यक्रमात प्रियांका त्याला ऑफर देते. ती ऑफर ऐकून कपिल शर्मा नकार देतो. नेमकी ती ऑफर काय होती पाहा.

जर तुला 2 करोडचा चेक आणि 6 तरुणींसोबत मालदीव हॉलीडे पॅकेज दिलं तर तू या पैकी कोणता पर्याय स्वीकारशील असं प्रियांकाने कपिलला विचारलं. त्यावर कपिल शर्माने हजरजबाबीपणे दिलेलं उत्तर ऐकून मात्र प्रेक्षक आणि नेटकऱ्यांमध्ये हशा पिकला. याबाबत बोलताना कपिल शर्मा म्हणाला, 'मी 2 कोटींचा चेक स्वीकारेन. कारण 60 हजार रुपयांमध्ये मी 6 सुंदर तरुणींसोबत हॉलीडे पॅकेज अरेंज करू शकतो'.The Sky is Pink च्या प्रमोशनसाठी प्रियांका चोप्रा कपिल शर्माच्या कार्यक्रमात आली होती. यावेळी दोघांनी अनेक गमतीजमती शेअर केल्या.

Loading...

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

The Sky is Pink या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये प्रियांका चोप्रा सध्या व्यस्त आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत फरहान अख्तर, जायरा वसीम, रोहित शरफ मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. The Sky is Pink हा चित्रपट एक भावनिक कुटुंबाची कथा सांगणारा आहे. प्रियांका-फरहानची प्रेमकथा आणि त्यानंतर मुलीला होणार आजार त्यामुळे कुटुंबात होणारे ताणतणाव, आघात यावर हा चित्रपट आहे.

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 02:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...