कपिल शर्माने केला खुलासा, 'या' कारणामुळे सोडला नवज्योतसिंग सिध्दूने शो

कपिल शर्माने केला खुलासा, 'या' कारणामुळे सोडला नवज्योतसिंग सिध्दूने शो

त्यावर कपीलनेही खास उत्तर दिलं. तो म्हणाला, उर्वशीची जादू कायमच असते. उर्वशीनेच तपस्या भंग केलीय.

  • Share this:

मुंबई 17 नोव्हेंबर : छोट्या पडद्यावचा 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) हा प्रचंड लोकप्रिय आहे. कपीलचा एक खास चाहता वर्गही आहे. मध्यंतरी थोडे हेलकावे खावे लागले तरी हा शो लोकप्रियतेत कायम वर होता. या शोमध्ये कायम चित्रपटांचं प्रमोशन होत असतं. नुकतच पागलपंती (PagalPanti) या चित्रपटाची सगळी स्टारकास्ट कपीलच्या शोमध्ये आली होती. त्या शोमध्ये सगळ्यांनीच चांगलीच मस्ती केली. कपीलही खास मुडमध्ये होता त्यामुळे त्याने सगळ्यांचीच चांगलीच खेचली.या शोमध्ये पागलपंतीचे कलाकार अनिल कपूर (Anil Kapoor), अरशद वारसी (Arshad warsi), जॉन अब्राहम (John Abraham) आणि उर्वशी रौतेला (Urvashi rautela) सहभागी झाले होते. या शोचा व्हिडीओ कपीने सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यात सिद्धू पाजींनी का शो सोडला याचं कारण त्याने सांगितलंय.

धम्माल...मायकल जॅक्सन की टायगर श्रॉफ हा VIDEO पाहून तुम्हीच ठरवा!

कपीलशी बोलताना अनिल कपूर म्हणाले, उर्वशीसोबत बोलताना तुझा वेगळाच अंदाज असतो. त्यावर कपीलनेही खास उत्तर दिलं. तो म्हणाला, उर्वशीची जादू कायमच असते. उर्वशीनेच तपस्या भंग केलीय. मागच्या वेळी जेव्हा ती इथे आली होती तेव्हा ती सिद्धू पाजींनाही सोबत घेऊन गेली. त्यानंतर ते पुन्हा इथे परत आलेच नाहीत. कपीलच्या या खुलाश्यावर सगळेच हास्यकल्लोळात बुडून गेले.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 17, 2019, 10:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading