'त्यानं तर माझ्याही जाहिराती हिसकावल्या…’ कपिलचा अक्षय कुमारवर गंभीर आरोप

'त्यानं तर माझ्याही जाहिराती हिसकावल्या…’ कपिलचा अक्षय कुमारवर गंभीर आरोप

कपिल शर्मानं अक्षय कुमारवर स्वतःच्या जाहिराती हिसकावल्याचा आरोप केला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये या आठवड्यात 'सूर्यवंशी' सिनेमाची टीम प्रमोशनसाठी येणार आहे. हा सिनेमा खरंतर 24 मार्चला रिलीज होणार होता मात्र सध्या सगळीकडे सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या थैमानमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पण या सिनेमाचं प्रमोशन मात्र जोरदार सुरू आहे. नुकतीच या सिनेमाच्या कास्टनं कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली आणि यावेळीच कपिलनं अक्षय कुमारवर स्वतःच्या जाहिराती हिसकावल्याचा आरोप केला आहे.

कपिल शर्मा शोचा नवा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल अकाउंटवर हा प्रोमो शेअर करण्यात आला. ज्यात कपिल शर्मा टीम 'सूर्यवंशी'सोबत धम्माल मजा करताना दिसत आहे. पण यासोबतच त्यानं अक्षय कुमारला टार्गेट करण्याची संधी मात्र अजिबात सोडलेली नाही. या व्हिडीओमध्ये कपिल रोहित शेट्टीला म्हणतो, सर तुम्ही अजय देवगणसोबत ‘सिंघम’ बनवला, रणवीरसोबत ‘सिंबा’ आणि आता अक्षय कुमारला घेऊन ‘सूर्यवंशी’ तर अशी कोणती गोष्ट 'सिंघम' आणि 'सिंबा'मध्ये नव्हती जी तुम्ही 'सूर्यवंशी'मधून प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहात. त्यावर रोहित म्हणतो, सिनेमा पाहिल्यावर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल.

‘मी स्वतःसाठी कपडे घालते, इतरांसाठी नाही’ ट्रोलर्सना दिशा पाटनीचं सडेतोड उत्तर

कपिल पुढे म्हणतो, सर बाहेर काही लोक असं म्हणतात, जे 'सिंबा' आणि 'सिंघम'नं कमवलं ते अक्षय कुमार घेऊन गेला. यावर सर्वांना हसू येत. रोहित शेट्टी यावर म्हणतो की, तो खूप मेहनत करतो. यावर कपिल म्हणतो, हा हे खरं आहे, एका वर्षात 8 सिनेमा आणि माझ्यासारखं कोणी जाहिराती करत असेल तर त्यांच्या जाहिराती सुद्धा हिसकावून घेतो. मी एका प्रोडक्टची जाहिरात केली होती. मला वाटलं जाहिरात चांगली झाली. हिट सुद्धा झाली त्यामुळे आता पुढच्या वर्षी पुन्हा मलाच बोलवतील. पुढच्या वर्षी पाहिलं तर माझ्या जागेवर यमराजाच्या वेशात अक्षय म्हणताना दिसला, ‘तुमची पॉलिसी करुन घ्या.’

आमिर आणि सलमान दारुच्या नशेत मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होते आणि...

कपिलचं हे बोलणं ऐकल्यावर रोहित शेट्टी जोरजोरात हसू लागला. तर अक्षय कुमार त्याच्यावर उशी फेकून मारताना दिसला. अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा सिनेमा रिलीजच्या आधीच खूप चर्चेत आहे. या सिनेमात कतरिना कैफ जवळपास 10 वर्षांनंतर अक्षयसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमात अक्षय एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारत असून रोहित शेट्टीनं हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

बॉलिवूड सिनेमांबद्दलच्या अशा खास गोष्टी, ज्या आजही तुम्हाला माहित नसतील

First published: March 14, 2020, 12:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading