मुंबई 10 एप्रिल: कपिल शर्मा (Kapil Sharma) हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय विनोदवीरांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आपल्या अनोख्या अभिनयशैलीतून प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या कपिलकडे आज लाखोंचं फॅन फॉलोइंग आहे. पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. या कॉमेडी किंगची (Comedy king) संघर्षकथा अता चौथीच्या पुस्तकातून विद्यार्थांच्या भेटीला येत आहे.
स्वतः कपिल शर्मानं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्याच्या एका फॅन क्लबनं शेअर केली आहे, त्यात कपिलच्या नावाचा धडा त्या पुस्तकात दाखवला आहे. कपिलने ती पुन्हा रिपोस्ट केली आहे. ‘कॉमेडी किंग कपिल शर्मा’ असं या धड्याचे शीर्षक आहे. कपिलचा संघर्ष पाहून इतर विद्यार्थांनाही प्रेरणा मिळावी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळालं यासाठी शालेय पुस्तकात हा धडा सामिल करण्यात आला आहे. कपिलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा - कौटुंबीक हिंसाचाराला कंटाळून अभिनेत्रीनं केला आत्महत्येचा प्रयत्न
अवश्य पाहा - ‘हे काय घातलंय?...’; उर्वशी रौतेला विचित्र मास्कमुळं होतेय ट्रोल
कपिल शर्मा कसा झाला कॉमेडी किंग?
कपिलचा जन्म 1981 साली पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याचे वडिल पोलीस होते. पण तो लहान असतानाच कर्करोगामुळं त्याचं निधन झालं. परिणामी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी कपिलवर आली. अन् त्यानं देखील मिळेल ते काम करुन ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. सुरुवातीला तो एक पिसीओ बूथवर बसायचा. तिथंच त्यानं कपड्यांचा एक ठेला देखील सुरु केला होता. त्यावेळी तो बॉलिवूड कलाकारांची मिमिक्री करुन आपलं हे लहानसं दुकान चालवत होता.
दरम्यान कपिलनं द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये भाग घेतला. लक्षवेधी बाब म्हणजे 2007 साली प्रदर्शित झालेल्या या शोचा तो विजेताही ठरला. अन् तेथून कपिलच्या करिअरला खऱ्या अर्थानं गती प्राप्त झाली. त्यानंतर सोनी वाहिनीनं त्याला कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो होस्ट करण्याची संधी दिली. कपिलच्या अनोख्या विनोदी शैलीमुळं हा शो सुपरहिट ठरला, व सोबतच कपिलदेखील सुपरस्टार झाला. त्यानंतर त्याला काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे कधीकाळी रस्त्यावर कपडे विकणारा कपिल झाला सुपरस्टार विनोदवीर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Kapil sharma, School children, The kapil sharma show